|Thursday, January 17, 2019
You are here: Home » Top News » महिला क्रिकेटरजवळ मिळाल्या 14000 ड्रग्जच्या गोळय़ा

महिला क्रिकेटरजवळ मिळाल्या 14000 ड्रग्जच्या गोळय़ा 

ऑनलाईन टीम / ढाका :

एका महिला क्रिकेटरला 14000 ड्रग्जच्या गोळय़ासह पकडण्यात आल्यामुळे क्रिडाविश्वात खळबळ उडाली आहे. जियो टीवीच्या वृत्तानूसार बांगलादेशची महिला क्रिकेटर नाजरीन खान मुक्ता हिला पोलिसांनी ड्रग्जच्या गोळय़ासह पकडले आहे.

नाजरीन खान मुक्ता बांगलादेशची आघाडीची खेळाडू आहे. ढाका प्रीमियर लीगमध्ये सध्या खेळत आहे. पोलिस आधिकारी प्रोनब चौधरिंनी दिलेल्या माहितीनुसार, नाजरीन खान मुक्ता सामना खेळून माघारी परतत असताना चित्तागोंगमध्ये पोलिसांनी बसची तपासणी केली. या तपासणी दरम्यान नाजरीन खान मुक्ताच्या बॅगमध्ये ड्रग्जच्या 14 हजार गोळय़ा मिळाल्या. या गोळय़ा मॅथमपेटामिन आणि कॅफीनपासून तयार करण्यात आलेल्या आहेत. बांगलादेशमध्ये याला याबा गोळय़ा असे म्हणतात.

बॅगेत आढळलेल्या गोळय़ामुळे नाजरीन खान मुक्ताला क्रिकेट खेळण्यास अजीवन बंदीतर घातली जाऊ शकते. त्याशिवाय तिला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते आशी शक्मयता पोलिस आधिकारी प्रोनब चौधरिंनी व्यक्त केली. ऑगस्ट 2017 नंतर चित्तागोंगमध्ये ड्रग्जच्या गोळय़ा तयार करण्याचे कारखाने वाढले आहेत. गेल्या तीन महिन्यात 90 लाख गोळय़ा जप्त करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पोलिसांनी दिली.

 

Related posts: