|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » चंद्रकांत पाटलांनी निवडणूक लढवावी, पवारांचे कोल्हापुरात आव्हान

चंद्रकांत पाटलांनी निवडणूक लढवावी, पवारांचे कोल्हापुरात आव्हान 

ऑनलाईन टीम / कोल्हापूर :

अर्थव्यवस्था अडचणीत आहे. शेतकऱयांपासून सगळेच अडचणीत आले आहे. धोरणात्मक निर्णय हे मुख्यमंत्री घेत असतात मात्र आता ते निर्णय कोल्हापूर या उपकेंद्रातून घेतले जात आहेत, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

आयुष्यात कधी संधी मिळाली नाही तरी,सकाळ-दुपार – संध्याकाळ संधी घेतली जाते.त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी एकदा निवडणूक लढवावी, मग त्यांना समजेल, असे थेट आव्हान शरद पवारांनी दिले आहे. चंद्रकांत पाटील पुणे पदवीधरमतदार संघातून निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी, असे पवार म्हणाले.