|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » सेना-भाजपकडून कोकणवासीयांचा विश्वासघात

सेना-भाजपकडून कोकणवासीयांचा विश्वासघात 

नाणारबाबत परस्पर विरोधी भूमिकेवरून विरोधकांची टीका; उद्धव ठाकरेंसमोर देसाईंचा दिखावा : मुंडे

नाणार प्रकल्पाबाबत भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्यात आल्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी केल्यानंतर त्वरीत मुख्यमंत्र्यांनी नाणारच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द नाही, अशी प्रतिक्रीया दिली. सरकारमधील दोन पक्षांच्या वेगवेगळ्या भूमिकांवरून विरोधकांनी दोन्ही पक्षांवर टीका करताना शिवसेना-भाजपनी कोकणवासीयांचा विश्वासघात केल्याची टीका केली.

नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध म्हणजे त्यांच्यात आणि भाजपात झालेल्या एका डीलचा भाग आहे. उद्धव ठाकरे म्हणतात, ‘नाणार नाही देणार’, मग नाणारच्या तहात काय घेणार? ते उद्धव ठाकरेंनी सांगून टाकावे, असा टोला विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लगावला. तसेच, मुख्यमंत्र्यांना दिल्लीत कवडीचीही किंमत नसल्याचा आरोप उद्धव ठाकरे करतात. असे असेल तर अशा मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात तुमचे मंत्री कायम कशाला राहतात? सरकारमधून बाहेर पडण्याच्या शिवसेनेच्या इशाऱयांची आता डबल सेंचुरी होत आली आहे, अशी बोचरी टीका करून आता तरी शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार का, असा प्रश्न विखे यांनी उपस्थित केला. तर, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी, नाणारमधील भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याची कोणतीही कारवाई विभागाने सुरूच केलेली नसताना ही घोषणा म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर केलेला दिखावा आहे. देसाई यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परवानगी घेतली होती का? पॅबिनेट निर्णय झाला आहे का? हा प्रकल्प नाणारमध्ये येणार हे माहीत असताना आजपर्यंत शिवसेना आणि त्यांचे मंत्री गप्प का बसले? अधिसूचना रद्द करण्याची प्रक्रिया मंत्र्यांना माहीत नाही का? असे सवाल उपस्थित करतानाच सेना आणि भाजप हे दोघे मिळून कोकणवासीयांची फसवणूक करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. तसेच, दिल्लीमध्ये कोणाची पत आहे आणि कोणाची नाही, हे मला माहित नाही; पण भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची जनतेच्या मनातून पत गेली असल्याचा टोला मुंडे यांनी लगावला.

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी अधिसूचना रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रीमंडळात न्यावा लागतो. नंतर त्याबाबत निर्णय घेतला जातो. तो अशा पद्धतीने खुल्या मंचावर रद्द करता येत नाही. असे बोलून अधिसूचना रद्द करण्याचा शिवसेनेचा पब्लिसिटी स्टंट आहे, असा आरोपही मलिक यांनी केला.

रिफायनरी प्रकल्प काटोलला हलवावा : आशीष देशमुख

नागपूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव “ाकरे यांनी कोकणातील नाणार येथील पेट्रोकेमिकल रिफायनरी विदर्भात हलविण्यासा”ाr सहमती दर्शविली आहे. याचे स्वागत करीत आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर हा प्रकल्प नागपूर जिह्यातील काटोल एमआयडीसी क्षेत्रात स्थलांतरित करून तात्काळ कामाला सुरुवात करावी, अशी मागणी भाजपचे काटोलचे आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी एका पत्रकार परिषदेत केली. हा प्रकल्प नागपुरात झाल्यास येथील एक ते दीड लाख युवकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळेल, याकडे लक्ष वेधून यातील इंडस्ट्रियल वेस्टपासून वस्त्राsद्योग क्षेत्रातही नवे उद्योग सुरू करता येतील. विशेषत: नागपूर जिह्यातील इंडोरामाप्रमाणे अजून अनेक समकक्ष उद्योग उभे होऊन रोजगार निर्मिती होईल, असा दावा देशमुख यांनी केला.

Related posts: