|Monday, January 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » भररस्त्यात मॉडेलचा स्कर्ट ओढला

भररस्त्यात मॉडेलचा स्कर्ट ओढला 

इंदोरमधील धक्कादायक घटना : युवतीने ट्विटरवर केली तक्रार, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

वृत्तसंस्था/ इंदोर

एका मॉडेल युवतीचा मध्यप्रदेशातील इंदोर शहरात भररस्त्यात विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली आहे. दोन तरुणांनी स्कुटरवरून जाणाऱया युवतीचा स्कर्ट ओढला, यामुळे ही मॉडेल रस्त्यावर कोसळून जखमी झाली आहे.  या घटनेची तक्रार या युवतीने ट्विटरवर केली असून मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी या ट्विटच्या आधारे त्वरित कारवाई करण्याचा निर्देश पोलीस विभागाला दिला.

मुली, तुझ्या धैर्याचे मी कौतुक करतो. मी आणि पूर्ण प्रशासन तुझ्या मदतीसाठी कटिबद्ध आहे. आरोपींना शोधून काढत तुला न्याय मिळवून दिला जाईल. आरोपींची ओळख पटविण्यासाठी पोलिसांना मदत कर, असे आवाहन शिवराज यांनी पीडित युवतीला केले आहे.

सोमवारी दुपारी मुख्यमंत्र्यांच्या ट्विटला युवतीने री-ट्विट केले. मला न्यायपालिका आणि सरकारवर पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक महिला सुरक्षित रहावी असे मी इच्छिते, तुमचे धन्यवाद असे या युवतीने ट्विटमध्ये नमूद केले.

विनयभंगाची ही घटना 22 एप्रिल रोजी घडली आहे. युवती ऍक्टिव्हाने जात असताना दोन युवकांनी तिचा स्कर्ट ओढण्याचा प्रयत्न केला. त्यांना रोखण्याच्या प्रयत्नात तिने वाहनावरील संतुलन गमावले आणि ती रस्त्यावर कोसळली. हा प्रकार गर्दीच्या मार्गावर घडला, परंतु कोणीही गुंडांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही. घटनेनंतर युवती काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती.

मी काय परिधान करावे याचा निर्णय मीच घेईन. कोणालाही माझ्या कपडय़ांवरून मला त्रास देण्याचा अधिकार नाही. घटनेनंतर मदतीसाठी सरसावलेल्या एका गृहस्थाने स्कर्ट परिधान केल्याने हा प्रकार घडल्याचे सांगितल्याचे पीडित युवतीने ट्विट करत म्हटले.

Related posts: