|Sunday, August 19, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » केवळ मंगोलियापर्यंतच उडू शकणार किमचे विमान

केवळ मंगोलियापर्यंतच उडू शकणार किमचे विमान 

प्योंगयांग

 उत्तर कोरियाने आण्विक क्षेपणास्त्रांच्या प्रकरणी प्रगती केली असली तरीही किम जोंग उन यांचे विमान थट्टेचा विषय ठरले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत किम यांची चर्चा होणार आहे. किम यांचे सोव्हिएत काळातील विमान मंगोलियापर्यंतच उड्डाण भरू शकत असल्याचे समजते.

किम यांचे विमान 200 मैल अंतराच्या कक्षेपर्यंत उड्डाण भरू शकते. किम यांचे सोव्हिएत काळातील विमान या पुढील अंतर पुन्हा इंधन भरणा केल्याशिवाय गाठू शकत नाही. मंगोलियाचे उलनबटोर शहर दोन्ही देशांच्या चर्चेसाठी उपयुक्त ठरणार आहे. जपानचे अधिकारी आणि उत्तर कोरिया सरकार यांच्यातील चर्चेचे या शहराने यजमानपद पार पाडले आहे.

मार्च महिन्यात मंगोलियाचे माजी अध्यक्ष सखियागिन एल्बेडॉर्ज यांनी स्वतःच्या ट्विटमध्ये किम आणि ट्रम्प यांच्या प्रस्तावित चर्चेचे स्वागत करत याच्या यजमानपदाचा प्रस्ताव ठेवला होता. किम जोंग उन यांनी 2011 मध्ये सत्ता हाती घेतली होती. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी केवळ एक विदेश दौरा तो देखील रेल्वेच्या माध्यमातून केला आहे.

Related posts: