|Sunday, August 19, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » 164 वर्षे जुन्या मंदिराला सिंगापूर पंतप्रधानांची भेट

164 वर्षे जुन्या मंदिराला सिंगापूर पंतप्रधानांची भेट 

सोहळय़ासाठी 40 हजारो भाविक उपस्थित

वृत्तसंस्था/ सिंगापूर

सिंगापूरचे पंतप्रधान ली सेन लूंग सोमवारी 4 मंत्री आणि 40 हजार भाविकांसोबत 164 वर्षे जुन्या मंदिराच्या जिर्णोद्धार समारंभात सामील झाले. लिटिल इंडिया भागातील श्री श्रीनिवास पेरुमल नावाच्या या मंदिरात ‘महा सम्प्रक्षाणम’ नावाच्या अभिषेकानंतर 45 दिवसांपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. ली सेन यांनी रविवारी रात्री ट्विट करत या समारंभाची माहिती दिली होती.

हा समारंभ हिंदू पंचागातील सर्वात महत्त्वाच्या दिनांपैकी एक असल्याचे सिंगापूरच्या स्ट्रेट टाइम्सने म्हटले आहे. 2004 मध्ये पंतप्रधान झालेले ली सेन यांनी पहिल्यांदाच हिंदू मंदिराला भेट देत दर्शन घेतले आहे. पंतप्रधानांसोबत यावेळी सिंगापूरच्या सांस्कृतिक मंत्री ग्रेस फू, शिक्षण मंत्री जैलिन पुथुचेरी या देखील उपस्थित होत्या. लंडनमधील राष्ट्रकुल परिषदेत भाग घेतल्यावर पंतप्रधान थेट येथे पोहोचले आहेत. पंतप्रधानांचा हा पुढाकार विविध समुदायांबद्दल सरकारची प्रतिबद्धता दर्शवित असल्याचा दावा व्यापार तसेच उद्योग मंत्री एस. ईश्वरन यांनी केला. सर्व समुदायांना सोबत घेत परस्पर सहकार्य आणि सन्मान वाढविणारा हा क्षण आहे. सिंगापूरचे सामूहिक वैविध्य दर्शविणारा हा समारंभ असल्याचे ते म्हणाले.

Related posts: