|Monday, January 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » जीव वाचविण्यासाठी दाऊद, शकील भूमिगत

जीव वाचविण्यासाठी दाऊद, शकील भूमिगत 

भारतीय यंत्रणांची घेतली धास्ती : अवैध व्यवसाय अडचणीत, आर्थिक कोंडीची योजना ठरतेय यशस्वी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

 आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमचा सर्वात जवळचा सहकारी छोटा शकील भूमिगत झाला आहे. भारतीय यंत्रणांच्या भीतीने दाऊद तसेच शकीलने ठावठिकाणा बदलल्याचे समोर आले. छोटा शकीलची अलिकडच्या काळातील काही छायाचित्रे एका वृत्तसंस्थेच्या हाती लागली आहेत.

भारतीय यंत्रणांनी आपल्याविरोधात मोहीम सुरू केल्याची भीती दाऊद तसेच छोटा शकीलला वाटतेय. मागील 4 वर्षांमध्ये भारतीय यंत्रणांनी दाऊदच्या जगभरात पसरलेले अवैध व्यवसाय तेथील सरकारांच्या मदतीने बंद केले आहेत. यातील बहुतेक व्यवसाय दाऊद हाताळायचा किंवा त्यांची जबाबदारी दाऊदने स्वतःचा भाऊ अनीसकडे सोपविली होती. ज्यात दुबई, अमिरात आणि दक्षिण आफ्रिकेत फैलावलेला रियल इस्टेटचा व्यवसाय, अंमली पदार्थ आणि हिऱयांचा व्यवसाय समाविष्ट आहे.

शकील-अनीस वाद

हे उद्योग प्रभावित झाल्याने अनीसने छोटा शकीलवर जबाबदारी असणाऱया अवैध धंद्यांमध्ये हस्तक्षेप सुरू केला आहे. यावरून छोटा शकील आणि अनीसदरम्यान मतभेद निर्माण झाले असून नोव्हेंबर 2017 मध्ये दाऊद इब्राहिमला हस्तक्षेप करावा लागल्याचे समोर आले. वाद तात्पुरता शमला असला तरीही अनीस आणि शकील यांच्यात कधीही न भरून निघणारी दरी तयार झाली आहे. या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी छोटा शकीलला लक्ष्य करण्याची मोहीम आखल्याचे बोलले जाते.

मृत्यूची अफवा

या मोहिमेच्या भीतीपोटी छोटा शकील आणि अनीस इब्राहिमला भूमिगत व्हावे लागले आहे. त्याचबरोबर प्रकृती अस्वास्थामुळे दाऊदला कराचीतील निवासस्थान बदलावे लागले आहे. भारतीय यंत्रणांपासून जीव वाचावा म्हणून छोटा शकीलचा मृत्यू झाल्याचे वृत्त पसरविण्यात आले होते. भारतीय यंत्रणांचे लक्ष त्याच्यापासून हटावे यासाठी हा खटाटोप होता, परंतु हा कट यशस्वी झाला नाही आणि खोटं वृत्त पसरविणे आणि बनावट मृत्यू दस्तऐवज तयार करण्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली.

Related posts: