|Thursday, January 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » इस्रो बनवणार लष्करासाठी उपग्रह

इस्रो बनवणार लष्करासाठी उपग्रह 

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

भारताची आघाडीची अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ लष्करासाठी दळणवळण आणि टेहळणी उपग्रह बनवणार आहे. यासाठीचे काम वेगाने सुरु करण्यात आले आहे. सप्टेंबरमध्ये हे उपग्रह अवकाशात सोडले जातील. भारतीय लष्करासाठी हे उपग्रह ‘आँखे’ ठरणार असून शत्रू राष्ट्रांच्या सामरिक आणि सैन्य हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.

सध्या इस्रोने चांद्रयान-2 मोहिमेवर लक्ष केंद्रीत केले आहे. साधारणपणे ऑक्टोबर महिन्याच्या मध्यात ते सोडले जाणार आहे. त्याआधी इस्रो लष्करासाठी उपग्रह बनवत आहे. हा उपग्रह सामरिकदृष्टय़ा अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे भारतीय लष्कराला एक नवीन ‘डोळा’च प्राप्त होणार आहे. इस्रो जीसॅट 7 उपग्रह सप्टेंबरमध्ये सोडणार असून भारतीय हवाई दलाला हा उपग्रह अतिशय उपयुक्त ठरणार आहे. तर याच वर्षाच्या अखेरीस रिसॅट-2ए या उपग्रहाचे प्रक्षेपण केले जाणार आहे. हा उपग्रह दळणवळणासाठी उपयुक्त ठरणार आहे. हा उपग्रह जीएसएलव्ही एमके-2 या रॉकेट लाँचरच्या मदतीने सोडला जाणार आहे. वायुसेनेला याचा रडार यंत्रणेकरता मोलाचा उपयोग होणार आहे. ग्राऊंड रडार स्टेशन, हवाई तळ, एडब्ल्यूएसीएस एअरक्राफ्ट इंटरलिंक सुविधा, प्रगत नेटवर्क हवाई दलासाठी प्राप्त होणार आहे. हा उपग्रह 2013 मध्ये सोडण्यात आलेल्या जीसॅट 7 रुक्मिणी या उपग्रहाप्रमाणेच कार्यरत राहणार आहे. याचा लाभ सध्या नौदलाला अधिक प्रमाणात होत आहे. यामुळे भारतीय समुद्री प्रदेश तसेच सामरिकदृष्टय़ा महत्त्वाच्या भूभागांवर नजर ठेवणे, शत्रूच्या हालचालींचा वेध घेणे भारतीय लष्कराला शक्य होणार आहे.

Related posts: