|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » क्रिडा » सालाह पीएफएचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडू

सालाह पीएफएचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडू 

वृत्तसंस्था/ लंडन

लिव्हरपूलचा फॉरवर्ड मोहमद सालाहची इंग्लंडच्या व्यावसायिक फुटबॉलपटूंच्या संघटनेने (पीएफए) वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड केली आहे. हा पुरस्कार मिळविणारा तो पहिलाच इजिप्शियन खेळाडू आहे.

गेल्या वषी तो एएस रोमातून लिव्हरपूलमध्ये दाखल झाल्यापासून त्याने 41 गोल नोंदवले. त्याच्या खेळीमुळे लिव्हरपूलने चॅम्पिन्स लीगच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल आणि प्रिमियर लीगमध्ये त्याच्या संघाचे शेवटच्या चारमधील स्थानही निश्चित झाले आहे. त्याच्या या कामगिरीची दखल घेत त्याची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या पुरस्कारासाठी सहा जणांची यादी तयार करण्यात आली होती. त्यात 25 वषीय सालाहने बाजी मारली. यासाठी 92 प्रिमियर लीग व फुटबॉल लीग्स जे पीएफएचे सदस्य आहेत, त्यांनी मतदान केले होते. या पुरस्कारासाठी निवडलेल्या खेळाडूंत मँचेस्टर सिटीचे केविन डी ब्रुईन, लेरॉय सेन, डेव्हिड सिल्वा यांचा समावेश होता. सेनला वर्षातील सर्वोत्तम युवा खेळाडूचा तर चेल्सीच्या महिला संघातील फ्रॅन किर्बीला वर्षातील सर्वोत्तम महिला खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.