|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » शरद पवारांचे खासदारांच्या घरी डिनर

शरद पवारांचे खासदारांच्या घरी डिनर 

साखर उद्योगासह जिल्हय़ातील राजकीय घडामोडी विषयी चर्चा

प्रतिनिधी/ कोल्हापूर

 राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार दोन दिवसाच्या कोल्हापूर दौऱयावर आले आहेत. रविवारी रात्री त्यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्या निवासस्थानी  डिनर केले. यावेळी राज्यातील साखर उद्योगासह जिल्हय़ातील राजकिय घडामोडीची चर्चा झाली. आमदार हसन मुश्रीफ यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली.

 खासदार पवार दुपारी साडेतीनच्या सुमारास कोल्हापुरात दाखल झाले. यानंतर पंचशील हॉटेल येथे त्यांनी कार्यकर्त्याच्या गाटीभेटी घेतल्या. रात्री आठच्या सुमारास खासदार धनंजय महाडिक यांच्या निवासस्थानी डिनरसाठी गेले. त्यांच्या सोबत जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील, आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी खासदार निवेदिता माने, आर.के.पोवार, रामराजे कुपेकर, अनिल साळोखे, व्हि.बी.पाटील, रामराजे कुपेकर उपस्थित होते.

       आमदार हसन मुश्रीफांची उपस्थिती

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ यांच्यात कलगीतुरा सुरु आहे. आमदार मुश्रीफ यांचा महाडिकांच्या उमेदवारीला विरोध आहे. खासदार शरद पवार यांच्या दौऱयानिमित्त महाडिक, मुश्रीफ अमोरासमोर आले. तर मुश्रीफांनी सकाळीच पक्षाच्या बैठकीत रात्री कार्यक्रमानिमित्त बाहेर जाणार असल्यामुळे महाडिक यांच्या निवासस्थानी डिनरला जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. सायंकाळी पवार पंचशिल हॉटेलमध्ये आल्यानंतर के.पी.पाटील यांनी व मुश्रीफ यांनी एका कार्यक्रमाची पत्रिका दाखवून आपणास दुसरीकडे आमंत्रण असल्याचा दाखल देत रात्री महाडिकांच्या घरी डिनरसाठी येऊ शकणार नसल्याचे सांगितले. यावर पवारांनी के.पी.पाटील यांना परवानगी दिली. मात्र, मुश्रीफांना डिनरसाठी हजर राहण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे मुश्रीफ रात्री साडे आठच्या सुमारास महाडिक यांच्या निवासस्थानी आले. त्यांच्या उपस्थितीची चर्चा  सुरु होती.

साखर उद्योगावर चर्चा

आमदार हसन मुश्रीफ व खासदार महाडिक यांनी राज्यातील साखर उद्योगाबाबत पवार यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले, साखरेचे दर घसरत असून कारखान्यांना एफआरपीही देणे कठीण झाले आहे. 2600 रुपयांच्या वर कोणीही दर देऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. उत्तरप्रदेशमधील साखरेचा फटका राज्यातील साखर उद्योगावर बसत असल्याचेही सांगण्यात आले. यावर पवार यांनी उत्तरप्रदेशची आणि आपली फारशी परिस्थिती वेगळी नसल्याचे सांगितले. खासदार महाडिक यांनी पंतप्रधान मोदी यांना दिलेल्या निवदेनाची माहिती दिली. ते म्हणाले, साखर 25 टक्के निर्यात, 25 टक्के शासकीय गोडाऊनमध्ये शिल्लक ठेवण्याचा पर्याय दिला असल्याचे सांगितले.

 

Related posts: