|Saturday, December 15, 2018
You are here: Home » Top News » RTIमध्ये विचारणा, खात्यात 15 लाख कधी जमा होणार, पीएमओचे उत्तर..

RTIमध्ये विचारणा, खात्यात 15 लाख कधी जमा होणार, पीएमओचे उत्तर.. 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014मध्ये लोकसभा निवडणुकीत,देशाबाहेरील काळा पैसा भारतात आला तर प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रूपये जमा होतील, असे म्हटले होते.मोदींच्या या वक्तव्याचे उत्तर माहिती अध्गाकार कार्यकर्त्याने पंतप्रधान कार्यालयाकडे उत्तार मागितले आहे.

जनतेच्या खात्यात 15 लाख रूपये कोणत्या दिवशी जमा होतील,अशी विचारणा आरटीआयअंतर्गत पीएमओकडे करण्यात आली.मात्र पंतप्रधान कार्यालयाने केंद्रीय माहिती आयोगाला, आरटीआय अंतर्गत अशी कोणतीच माहिती नाही, असे सांगितले. त्यामुळे याबाबतची माहिती किंवा उत्तर दिले जाऊ शकत नाही, असे पीएमओने स्पष्ट केले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते मोहन कुमार शर्मा यांनी 2016 मध्ये नोटाबंदीच्या 18 दिवसानंतर माहिती मागवली होती. यामध्ये त्यांनी मोदींच्या घोषणेप्रमाणे 15 लाख रुपये कधी मिळणार, अशी विचारणा केली होती.मात्र त्यांना माहिती मिळत नव्हती. मग मोहन कुमार शर्मा यांनी मुख्य माहिती अधिकार आयुक्त आर के माथूर यांच्याकडे तक्रार केली होती.त्यानंतर मग मोहन कुमार शर्मा यांना सांगण्यात आलं की, त्यांनी विचारलेली माहिती ही माहिती अधिकार कार्यकक्षेत येत नाही. त्यामुळे ती माहिती उपलब्ध नाही.

 

Related posts: