|Saturday, August 24, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सैतानी कृत्य करणाऱयाला फासावर लटकवू!

सैतानी कृत्य करणाऱयाला फासावर लटकवू! 

भोपाळ  / वृत्तसंस्था :

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मध्यप्रदेशच्या मंडला येथील रामनगरमध्ये राष्ट्रीय पंचायत राजदिनाच्या कार्यक्रमात सामील झाले. महात्मा गांधींची स्वप्ने साकार करण्यासाठी पंचायत दिन ही संधी आहे. भारताची ओळख गावांमुळेच असल्याचे गांधींनी पुन्हापुन्हा अधोरेखित पेले होते. देशाच्या विकासासाठी गावांचा कायापालट होणे गरजेचे असल्याचे मोदी यावेळी म्हणाले. मुलींवर अत्याचार करणाऱया सैतानांसाठी केंद्र सरकारने कायदा निर्माण केला आहे. या कायद्याच्या माध्यमातून सैतानी कृत्य करणाऱयांना फासावर लटकविले जाईल अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी मोदींनी केली.

मुलींचा सन्मान करण्याची शिकवण घेण्याची आम्हाला गरज आहे. त्याचबरोबर मुलांना जबाबदारीचे धडे देणे गरजेचे आहे. जो सैतानी कृत्य करेल, तो फासावर लटकविला जाईल. परंतु आम्हालाच आमच्या मुलींच्या रक्षणाची जबाबदारी घ्यावी लागेल. याला सामाजिक आंदोलन करावे लागेल असे मोदी म्हणाले.

गावांचा कायापालट

एकेकाळी अपुरी आर्थिक तरतूद समस्या होती, परंतु निधीची चणचण होत नाही, सद्यकाळात निधीचा दिलेल्या मुदतीत योग्य वापर कसा करावा याची चिंता आहे. समस्या पैशांची असून प्राधान्यक्रमाच्या अभावाची असल्याचा दावा मोदींनी केला. गावांसाठी काहीतरी करण्याचा संकल्प सर्वांनी घ्यावा. सध्या लोकशाही असून एका निश्चित कालावधीसाठी गावाच्या लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे. 5 वर्षांच्या मुदतीत 5, 10 किंवा 15 चांगली कामे करून दाखविण्याची इच्छा मनात नसणारा सरपंच कोठेच नसेल असे मोदी म्हणाले.

3 महत्त्वाच्या योजना

जनधन, वनधन आणि गोवर्धन या तीन योजनांवर तुमचे लक्ष वळवू इच्छितो. जनधनद्वारे गाव आणि परिवाराच्या अर्थव्यवस्थेला मुख्य प्रवाहात आणले जाऊ शकते. वनधनच्या माध्यमातून उत्पन्न मिळविता येणार आहे. गावाने शेण आणि कचऱयाचा वापर योग्यप्रकारे केल्यास वीजनिर्मिती होऊ शकते आणि कोणतीही आरोग्यविषयक समस्या सुटू शकते असे मोदींनी उपस्थितांना उद्देशून म्हटले.

झिरो बजेटची शेती

पंतप्रधानांनी गावांमध्ये झिरो बजेट शेतीवर काम करण्याची सूचना केली. त्यांनी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा उल्लेख केला. आचार्य झिरो बजेटची शेती कशी करावी याचे प्रशिक्षण लोकांना देत आहेत. अशा अनेक लोकांपासून प्रेरणा मिळवून स्वतःच्या गावात हा उपक्रम राबवू शकता. गावांमध्ये जलसंरक्षणावर कार्य करण्याचा विचार सरपंचांनी करावा, पाण्याचा एक-एक थेंब महत्त्वाचा असल्याचे मोदींनी सरपंचांना उद्देशून म्हटले आहे.