|Monday, January 21, 2019
You are here: Home » क्रिडा » सचिनवर शुभेच्छांचा वर्षाव, ऑस्ट्रेलियाचा मात्र खोडसाळपणा

सचिनवर शुभेच्छांचा वर्षाव, ऑस्ट्रेलियाचा मात्र खोडसाळपणा 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

मंगळवारी 45 व्या वर्षात पदार्पण करणाऱया भारतरत्न सचिन तेंडुलकरवर सर्व स्तरावरुन शुभेच्छांचा वर्षाव झाला. विद्यमान कर्णधार विराट कोहलीपासून अभिषेक बच्चनपर्यंत अनेक खेळाडू-कलाकारांसह चाहत्यांनी देखील सचिनला शुभेच्छा दिल्या. सचिनने निवासस्थानी केक कापला, त्यावेळी त्याची पत्नी अंजली ही देखील समवेत होती. मुंबईतील चाहत्यांनी शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या निवासस्थानी  मोठी गर्दी केली होती.

साधारपणे 2 दशके क्रिकेट जगतावर गारुड घालणाऱया सचिन तेंडुलकरने नोव्हेंबर 2013 मध्ये आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर विंडीजविरुद्ध कसोटी सामन्याच्या माध्यमातून त्याने क्रिकेट जगताला अलविदा केला. पण, त्यानंतर आताही त्याची लोकप्रियता कायम आहे, हे मंगळवारी पुन्हा अधोरेखित झाले.

मंगळवारी त्याच्या वाढदिवशी आजी-माजी खेळाडूंनी, चाहत्यांनी विशेषतः सोशल नेटवर्कच्या माध्यमातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. ‘तुझ्यापासून आम्हाला नेहमीच प्रेरणा मिळाली. अगदी तू आता निवृत्त झाला असलास तरी तूच सध्याच्या खेळाडूंसाठी देखील रोल मॉडेल आहेस’, अशा शब्दात व्हीव्हीएस लक्ष्मणने सचिनला शुभेच्छा दिल्या. ‘पूर्ण भारतवर्षाला रोखण्याची ताकद असलेल्या दिग्गजाला सलाम. बॅट देखील धारदार शस्त्र होऊ शकते, हे सचिननेच दाखवून दिले आणि माझ्यासारख्या खेळाडूंना त्याचा वापर करुन घेता आला’, असे सहकारी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग म्हणाला.

सुरेश रैना, केएल राहुल यांनीही 100 आंतरराष्ट्रीय शतके झळकावणाऱया या दिग्गज फलंदाजाला शुभेच्छा दिल्या. ‘सचिन फलंदाजीला उतरायचा, तो क्षण देखील नजरेत टिपण्यासाठी चाहते पुढे सरसावत असत. ही त्याच्या प्रेमापोटी मोठी पोचपावतीच ठरायची’, असे रैना म्हणाला. सचिनपासून आम्ही रोज प्रेरणा घेतो, असे केएल राहुलने ट्वीट केले. युवराज सिंग, इशांत शर्मा, हरभजन सिंग आदींनीही सचिनला यावेळी शुभेच्छा दिल्या.

Related posts: