|Thursday, January 17, 2019
You are here: Home » Top News » सहिष्णु देशांच्या यादीत भारत चौथ्या स्थानावर : सर्व्हे

सहिष्णु देशांच्या यादीत भारत चौथ्या स्थानावर : सर्व्हे 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

जागतिक नकाशावर भारताने सहिष्णूचेच्या बाबतीच चौथं स्थान पटकावलं आहे. सहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीत कॅनडा, चीन, मलेशियानंतर भारताचा क्रमांक लागतो. इप्सॉस मॉरी यांच्या सर्व्हेतून ही बाब समोर आली आहे.

यावर्षाच्या सुरूवातीला इप्सॉस मॉरी यांनी बीबीसीसाठी 27 देशांचा सर्व्हे केला. त्यामध्ये सुरूवातीला त्यांनी 20 हजार लोकांनाच्या मुलाखती घेतल्या. लोकांच्या मते समजाचं विभाजन करणाऱया कुठल्या गोष्टी आहे? याबद्दल माहिती गोळा करण्यात आली. सर्व्हेनुसार 63 टक्के भारतीय लोक विविध संस्कृती, दृष्टीकोनाच्या बाबतीत प्रत्येकाचं वेगळं मत असल्याने ते भारताला सहिष्णू देश मानतात. दुसरीकडे हंगरीमधील लोक त्यांच्या देशाला सर्वात कमी सहिष्णू देश मानतात. त्यानंतर दक्षिण कोरिया आणि ब्राझिलचा क्रमांक लागतो.

 

Related posts: