|Saturday, October 20, 2018
You are here: Home » Top News » पुण्यात कमाल तापमानात वाढ होणार

पुण्यात कमाल तापमानात वाढ होणार 

ऑनलाईन टीम / पुणे :

पुणे अणि परिसरात उन्हाचा तडाख्यात दोन दिवसात वाढ होणार आहे. शहरातील तापमानात वाढ होऊन मंगळवारी तापमानाचा पारा हा 39.7 अंशावर गेला. येणाऱया दोन दिवसात कमाल तापमानात वाढ होणार असून पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जाणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.

शहरातील तापमान वाढण्यास सोमवारी सकाळपासून सुरूवात झाली. तर मंगळवारी दुपारी 12 ते 4 च्या दरम्यान पुणेकर हे उष्णतेने हैरान झाले. सिग्नलवर थांबलेल्यांना आणि बाजारपेठेतील लोकांना उन्हाचा चांगलाच फटका बसत आहे. मिळेल तिथे सावलीत थांबून उन्हापासून स्वतःचा बचाव करतांना अनेकजन दिसत आहेत.

 

Related posts: