|Monday, January 21, 2019
You are here: Home » Top News » गांधी हत्येशी सावरकरांचा दुरान्वये संबंध नाही : प्रा. शेषराव मोरे

गांधी हत्येशी सावरकरांचा दुरान्वये संबंध नाही : प्रा. शेषराव मोरे 

 ऑनलाईन टीम / पुणे :

महात्मा गांधी हत्या प्रकरणात सावरकरांचा दुरान्वयेदेखील संबंध नव्हता. न्यायालयातही तेच सिद्ध झाले. त्यामुळेच त्यांची निर्दोष मुक्तता झाली. मात्र, सावरकरांची अव्याहत बदनामी सुरू ठेवणाऱयांना आणखी कोणते पुरावे द्यावेत, असा सवाल ज्येष्ठ विचारवंत प्रा. शेषराव मोरे यांनी येथे उपस्थित केला.

वक्तृत्त्वोत्तेजक सभेतर्फे टिळक स्मारक मंदिरात आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या 144 व्या ज्ञानसत्रात प्रा. मोरे यांनी चौथे पुष्प गुंफले. ‘गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी’ या विषयावर त्यांनी विचार व्यक्त केले.

प्रा. मोरे म्हणाले, सावरकरांची भूमिका गांधी अथवा काँग्रेसविरोधी नव्हती, तर समर्थनाची होती. हे सावरकरांच्या अनेक पत्रातून स्पष्ट होते. सावकरांच्या विचारात राष्ट्रभक्ती व राष्ट्रहित होते. हे आपण कधी समजून घेणार आहोत की नाही? सावकरांच्या विचारात देशभक्ती असेल, तर महात्मा गांधी यांच्यासारख्या व्यक्तींची हत्या करून स्वतःला कलंकित करून घेण्याची त्यांना इच्छा होती का? गांधीजींच्या विचाराचे समर्थन करणारे सावरकर गांधी हत्याकांडात सहभागी तरी होतील का? या सर्व गोष्टींचा विचार व्हावा.

गांधी हत्याकांडात सावकरांचा सहभाग होता, अशी एकमेव साक्ष दिगंबर बडगे यांनी दिली होती. त्यात अनेक तफावती आहेत. कपूर आयोगानेही गांधी हत्येसंदर्भात जे निष्कर्ष काढले आहेत, ते निराधार व बेकायदेशीर आहेत. कारण बडगे हे एकमेव साक्षीदार असताना कपूर आयोगाने एकदाही बडगे यांची साक्ष घेतली नाही. ही गोष्ट गंभीर आहे. मुळात गोडसे सावरकरांचे अनुयायी असतील, तर सावरकरांनी त्यांना गांधी हत्या करण्यास मान्यता दिली असती का? स्वतः सावकरांना गांधीजीचा हत्यारा म्हणून घेणे आवडले असते का? सावरकरांच्या विचारात राष्ट्रहित असेल, तर राष्ट्रासाठी कार्य करणाऱया गांधीजीच्या हत्येचा कट सावरकरांनी रचला असता का? अथवा हत्येची माहिती असती, तर ती घडू दिली असती का? सावरकरांची गांधींविषयीची भूमिका, न्यायालयात सादर झालेले पुरावे, तर्कवितर्क आदी सर्व बाबींचा विचार करता गांधी हत्येत सावकरांचा दुरान्वये संबंध नव्हता हेच सिद्ध होते, असेही त्यांनी सांगितले.

Related posts: