|Monday, January 21, 2019
You are here: Home » Top News » आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला

आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला 

ऑनलाईन टीम / सांगली :

सांगलीमधील जत तालुक्यात आरोपीला पकडायला गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सातारा आणि जत पोलिस दल एका आरोपीला शोधण्यासाठी गेले असता, तेथिल जमावाने रात्रीच्या सुमारास हा हल्ला केला आहे.

सातारा जिल्हय़ात एका आरोपीला पकडण्यासाठी सातारा आणि जत पोलिसांचे पथक मंगळवारी रात्री प्रतापपूर गावात गेले, पण त्या ठिकाणी तो आरोपी सापडला नाही. आरोपी नसल्यामुळे पोलिसांनी त्याच्या भावाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, पण तिथे जमलेल्या जमावाने विरोध करत पोलिसांवर हल्ला केला. या घटनेनंतर पोलिस आणि जमावामध्ये वादावादी सुरू झाली. या वादावादीत जमावाने पोलिसांच्या गाडीवर जोरदार दगडफेक करत दोन गाडींचे नुकसान केले. या घटनेनंतर गावात काही तास तणावाचे वातावरण होते. सध्या गावात पोलिस बंदोबस्त वाढवला असून परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे जतचे पोलिस उपअधीक्षक सांगितले. दरम्यान, पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी आतापर्यंत दहा जणांना अटक करण्यात आली आहे.

 

Related posts: