|Sunday, August 19, 2018
You are here: Home » Top News » मामासोबत गावी जात असतांना मुलाचा रेल्वेतून पडून मृत्यू

मामासोबत गावी जात असतांना मुलाचा रेल्वेतून पडून मृत्यू 

ऑनलाईन टीम / पिंपरी :

मामाच्या गावी जात असतांना एका तेरा वर्षीय मुलाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची दुदैवी घडना घडली आहे. चिंचवडमध्ये आज सकाळी नऊ वाजता ही घडना घडली आहे. मृत्यू झालेल्या मुलाचे नाव अर्जुन रमेशराव असे आहे.

डोंबिवलीहून इंद्रायणी एक्सप्रेसने अर्जुन मामासोबत सोलापूरला जात होता. पण सकाळी रेल्वे चिंचवडमध्ये पोहोचली तेव्हा गाडीच्या दारातून तोल जाऊन अर्जुन अचानक खाली पडला. यात डोक्मयाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. महत्त्वाचे म्हणजे भाचा खाली पडल्याची चाहूल मामाला लागली नाही. रेल्वे पोलिसांनी कुटुंबीयांशी संपर्क साधल्यानंतर मामाच्या कानावर ही बाब पडली. तोपर्यंत मामा बराच पुढे गेला होता. दरम्यान, लोहमार्ग पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

 

Related posts: