|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीतील विविध समस्यांवर चर्चा

पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीतील विविध समस्यांवर चर्चा 

वार्ताहर /कसबा सांगाव :

कागल-हातकणंगले पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीच्या समस्यांसाठी महावितरण कंपनी व महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ अधिकारी व मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या अधिकाऱयांची बैठक नुकतीच पार पडली. याबैठकीत विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी झालेल्या बैठकीत औद्योगिक वसाहतीतील विद्युतपुरवठा वारंवार खंडीत होत असल्याच्या कारणावरुन महावितरण कंपनीच्या अधिकाऱयांनी या उद्योजकांना केबलचा नकाशा तयार करुन त्याची प्रत औद्योगिक विकास महामंडळ व मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल कार्यालयास  उपलब्ध करुन देण्यात यावे. यामुळे खुदाई काम करताना कोणताही अपघात घडणार नाही, हाय व्होल्टेजमुळे विद्युतपुरवठा खंडीत होऊ नये महावितरणकडून अखंडीत विद्युतपुरवठा करण्यात यावा.ज्याठिकाणी ट्रान्फार्म उघडय़ावर आहेत त्यांना पेटीत बसविण्यात यावेत, मुडशिंगी सबस्टेशनडून हाते असलेला विद्युतपुरवठा पंचतारांकीत औद्यांगिक वसाहतीतील सबस्टेशनकडून करण्यात  यावा, अशी मागणी रेमण्ड कंपनी मार्फत करण्यात आली. तसेच औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्त्याची दुरावस्था झाली आहे. ते रस्ते लवकरात लवकर करावेत. लक्ष्मी टेकडीपासून ते जवाहर पर्यंत गतीरोधक बसविण्यात यावेत, अनेक स्ट्रीट लाईट बंद वस्थेत आहेत ते सुरळीत सुरु करावेत, रेमण्ड चौक किर्लोस्कर फॉस्टी येथे हायमास्क बसविण्यात यावे, बीसीसी घेतलेल्या उद्योजकांना पाणीपट्टीत सवलत देण्यात यावी, लक्ष्मी टेकडी येथे ट्राफिक पोलीस नेमण्यात यावा या मागण्यांसह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता शिंदे, उपअभियंता श्रीगणेश पवार,  कळसुरकर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपअभियंता अपराज, , प्रदीप सामंत, अग्नीशामक दलाचे सचिन नेरुरकर, तसेच मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष हरिशचंद्र धोत्रे, रघुनाथ थोरात, प्रताप परुळेकर, विठ्ठल पाटील, अमृत यादव, सुरेश क्षीरसागर, संगमेश्वर पाटील आदींसह उद्योजक उपस्थित होते.