|Thursday, January 17, 2019
You are here: Home » Top News » शिवसेनेच्या नेत्याच्या हत्येचा कट पत्नीकडूनच

शिवसेनेच्या नेत्याच्या हत्येचा कट पत्नीकडूनच 

ऑनलाईन टीम / मुंबई :

शिवसेनेचे नेते शैलेश निमसे यांच्या हत्यप्रकरणी पत्नी साक्षी निमसे हिला ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. साक्षीसह प्रमोद लुटे या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

शैलेश निमसे हे शहापूरमधील शिवसेनेचे उपतालुका प्रमुख या पदावर कार्यरत होते. भिवंडी तालुक्मयातील दिघाशी जवळील देवचोळा येथे शैलेश निमसे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येनंतर त्यांची ओळख होऊ नये म्हणून त्यांचा मृतदेह पेटवण्यात आला होता. शैलेश निमसे यांची पत्नी साक्षीने हत्येची सुपारी दिल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.

शैलेश निमसे यांचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. यावरून पत्नीसोबत त्यांचे वाद होत असत. पत्नीला ते मारहाण करायचे. यातून साक्षीने हत्येची सुपारी देत, घरातच शैलेश निमसे यांचा गळा दाबून हत्या केली, असे पोलिस तपासात उघड झाले. विशेष म्हणजे, पोलिसांचा तपास भरकटावा म्हणून शैलेशची पत्नी साक्षी हिने जंगली महाराज ट्रस्टच्या पदाधिकाऱयांचा हात आपल्या पतीच्या हत्येत असल्याचा संशय पोलिसांकडे व्यक्त केला होता. मात्र पोलिसांनी उलट तपास करून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक बाबींतून हत्येचा उलगडा केला.

 

Related posts: