|Friday, May 24, 2019
You are here: Home » क्रिडा » वोझ्नियाकी दुसऱया फेरीत

वोझ्नियाकी दुसऱया फेरीत 

वृत्तसंस्था /इस्तंबुल :

इस्तंबुल चषक टेनिस स्पर्धेत जागतिक द्वितीय मानांकित कॅरोलिन वोझ्नियाकीने महिला एकेरीची दुसरी फेरी गाठाताना रशियाच्या एकतेरिना अलेक्झांड्रोव्हाचा पराभव केला.

डेन्मार्कच्या वोझ्नियाकीने हा सामना 6-2, 6-2 असा सहजतेने जिंकला. या मोसमातील क्ले कोर्टवरील तिचा हा पहिलाच विजय आहे. चार वर्षांच्या खंडानंतर ती स्पर्धेत पुन्हा खेळत आहे. तिची पुढील लढत फ्लिपकेन्स किंवा सारा इराणी यापैकी एकीशी होईल. अन्य एका सामन्यात ऍग्नीस्का रॅडवान्स्काने दुखापतीमुळे माघार घेतल्याने डोना वेकिकला दुसऱया फेरीत स्थान मिळाले. क्रोएशियाची वेकिक 6-1, 2-0 अशी आघाडीवर असताना रॅडवान्स्काने थांबण्याचा निर्णय घेतला. हॉलंडच्या पात्रता फेरीतून आलेल्या अरांत्झा रुसने चीनच्या झांग शुआईला 6-2, 6-3 असा पराभवाचा धक्का दिला तर कझाकच्या युलिया पुनित्सेव्हाने सहाव्या मानांकित सोराना सिर्स्टियाचा 0-6, 6-1, 6-0 असा धुव्वा उडविला.

Related posts: