|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » राज्यभरात शिकाऊ डॉक्टरांचे आंदोलन

राज्यभरात शिकाऊ डॉक्टरांचे आंदोलन 

3 मे पर्यंत विद्यावेतन वाढीचा अल्टीमेटम

मुंबई / प्रतिनिधी

राज्यभरातील 3 हजार शिकाऊ (इंटर्न) डॉक्टरांनी गुरुवारी शांततेत आंदोलन केले. त्यांना देण्यात येणारे विद्यावेतन अत्यंत तुटपुंजे असून 6 हजार प्रतिमहिना देण्यात येते. मात्र, इतर राज्यांतील शिकाऊ डॉक्टरांना 15 ते 20 हजार रुपये विद्यावेतन देण्यात येते. त्यामुळे वैद्यकीय आणि दंत शिकाऊ डॉक्टरांना विद्यावेतन वाढवून देण्याचा निर्णय तीन महिन्यात घेण्यात यावा; अन्यथा पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असे असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न संघटनेचे सचिव डॉ. असिफ पटेल यांनी सांगितले. दहा वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयाचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. महाविद्यालयाच्या परिसरातच सायंकाळी राज्यभरात एकाच वेळी शांततेत आंदोलन करण्यात आले. प्रत्येक वैद्यकीय विषयातील पदवीधराला सरकारी रुग्णालयात एक वर्षाची इंटर्नशिप करावी लागते. या शिकाऊंना प्रत्येक आठवडय़ाला 60 ते 70 तास काम करावे लागते. मात्र, त्यांना प्रतिमाह 6 हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. 2015 साली वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने 11 हजार रुपये एवढा विद्यावेतन ठरवले आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्याप होत नसल्याची खंत डॉ. असिफ पटेल यांनी व्यक्त केले. नियमाप्रमाणे 24 हजार प्रतिमाह पगार देणे असूनही विद्यावेतन कमी दरात दिला जात असल्याची तक्रार यावेळी डॉक्टरांनी केली. यावर आगमी तीन मे पर्यंत विचार करावा; अन्यथा बेमुदत संपावर जाणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले. या आंदोलनाला आयएमए संघटनेचा देखील पाठींबा होता.

Related posts: