|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » वाहतुकीच्या नियमांचे पालन करुन आपघात टाळा

वाहतुकीच्या नियमांचे पालन करुन आपघात टाळा 

प्रतिनिधी /गोडोली :

वाहतुकीच्या नियमांचे पालन केले तर अपघात टाळले जाऊ शकतात. बेशिस्त बेजबाबदारपणे वाहन चालविणारे चालक वाहतुकीच्या नियमांचे उल्लघन करतात. मात्र एक अपघात अनेकांचे आयुष्य उध्वस्त करत असतो. दररोज रस्ते अपघातात हजारोंचा मृत्यू आणि लाखोंच्या संख्येत जखमी होणाऱयांची संख्या आहे. आपण नेहमीच जशी स्वतःची काळजी घेत असतो, तशी वाहन चालविताना इतरांची काळजी घ्या.वाहतुकींच्या नियमांचे पालन करुन अपघात टाळा, असे आवाहन ‘तरुण भारत‘ चे आवृती प्रमुख दीपक प्रभावळकर यांनी केले.

संपूर्ण राज्यात 29 वा रस्ता सुरक्षा सप्ताह सुरु आहे. या दरम्यान जिह्यातील अनेक ठिकाणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, महामार्ग पोलीस विभाग, रिलायन्स हायवे ऍथॅरिटी यांच्यासह विविध सामाजिक संस्थांच्या वतीने वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. आनेवाडी टोलनाका येथील रिलायन्स हायवे मॅनेजमेंटच्यावतीने भुईंज येथील के.बी.पी.ज्युनिअर कॉलेज येथे विद्यार्थ्यासाठी प्रबोधन कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे, हायवे मॅनेजर संकेत गांधी यांनी मार्गदर्षन केले. यावेळी प्राचार्य विजयकुतार माने, पोलीस उपनिरीक्षक अधिकराव यादव, हायवे मॅनेजर संकेत गांधी, विवेक शर्मा, सुरेश यादव, विजय नवले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आनेवाडी टोलनाक्यावर दोनषेहून अधिक वाहन चालकांची नेत्र तपासणी प्रत्येक वाहन चालकाला रस्ते सुरक्षा सप्ताहाची माहिती वाहतुकीच्या नियमांचे माहिती पत्रक, सुरक्षेचे संदेश देणारे माहिती पत्रक देण्यात आली. ‘तरुण भारत’ चे आवृती प्रमुख दीपक प्रभावळकर यांच्या हस्ते छोटय़ा व अवजड वाहनांना रिप्लेक्टर लावण्यात आले. तर वाहतुकीच्या नियमांची माहिती पत्रके वाटण्याचा शुभारंभ पत्रकार वसीम शेख, विजय जाधव, संकेत गांधी, विवेक शर्मा यांच्या हस्ते करण्यात आला. महामार्गावर अनेक ठिकाणी सुरक्षेचे संदेश देणारे बॅनर, तर टोलनाका मॅनेजमेंटकडून सप्ताहात सीट बेल्ट व हेल्मेट घातलेल्या चालकांना गुलाब पुष्प देण्यात आले.