|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » क्रिडा » प्रज्नेश गुणेश्वरन विजेता

प्रज्नेश गुणेश्वरन विजेता 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

 नवोदित टेनिसपटू प्रज्नेश गुणेश्वरनने रविवारी येथे एटीपी चँलेजर सर्कीटमधील पहिल्यांदा एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले. प्रज्नेशने अंतिम सामन्यात इजिप्तच्या मोहम्मद सेफवातचा दोन तासांच्या कालावधीत 5-7, 6-3, 6-1 असा पराभव केला.

चेन्नईच्या 28 वर्षीय प्रज्नेशने या स्पर्धेत जेतेपदाबरोबरच 125 मानांकन गुण आणि 21600 डॉलर्सचे बक्षीस पटकाविले. प्रज्नेशला 2016 च्या ऑक्टोबरमध्ये झालेल्या पुण्यातील एटीपी चँलेजर स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.