|Thursday, January 17, 2019
You are here: Home » Top News » दादासाहेब फाळकेंना गुगलची आदरांजली

दादासाहेब फाळकेंना गुगलची आदरांजली 

ऑनलाईन टीम/ मुंबई :

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक धुंडिराज गोविंदा फाळके अर्थात दादासाहेब फाळके यांची आज 148वी जयंत त्यांच्या जयंती निमित्तने गुगलनं खस डूडल तयार करून त्यांना आदरांजली वाहिली आहे.

समारे दीडशे वर्षांपूर्वी आजच्या दिवशी नाशिकमधील त्र्यंबक येथे गोविंदशास्त्री आणि द्वारकाबाई फाळके यांच्या घरात धुंडिराज यांचा जन्म झाला. मुंबईच्या मराठा हायस्कूलमधून मॅट्रिक झाल्यावर 1885 साली ते जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये दाखल झाले. पुढे 1890 साली बडोद्याच्या कलाभवनातून त्यांनी चित्रकलेचा शिक्षण पूर्ण केले. कलेचे प्रचंड वेड असलेल्या फाळकेंनी चित्रकला, वास्तुकला, प्रोसेस फोटोग्राफी अशा अनेक कला आत्मसात केल्या. मुंबईत 15 एप्रिल 1910 रोजी ख्रिस्ताच्या जीवनावर आधारित ’द लाईफ ऑफ ख्राइस्ट’ हा अर्ध्या तासाचा मूकपट त्यांनी पाहिला आणि स्वदेशी चित्रपटांच्या कल्पनेचे बीज रोवले गेले. राजा रवी वर्मा यांच्या कलेने भारावलेल्या फाळकेंनी त्यांच्या पौराणिक चित्रांच्या माध्यमातून प्रेरणा घेत भारतीय संस्कृतीतील विविध पौराणिक कथा मोठय़ पडद्यावर मांडण्याचे आव्हान पेलायचे ठरवले. भारतात स्वदेशी चित्रपटव्यवसाय उभारण्याचे ध्येय त्यांनी उराशी बाळगले आणि या ध्येयाच्या वेडापायी त्यांनी पुढील अभ्यासासाठी थेट लंडन गाठले. रात्रंदिवस अविरतपणे झटून चित्रपटनिर्मितीची कलाही त्यांनी आत्मसात केली. अखेर, 3 मे 1913 रोजी ’राजा हरिश्चंद्र’ हा संपूर्ण भारतीय बनावटीचा पहिला मूकपट तयार केला आणि भारतात चलचित्रांचा आरंभ झाला. विशेष म्हणजे या मूकपटासाठी लेखक, छायालेखक, रंगवेशभूषाकार, कलादिग्दर्शक, दिग्दर्शक, रसायनकार, संकलनकार इ. सगळय़ा भूमिका दादासाहेबांनीच पार पाडल्या.

 

 

 

 

Related posts: