|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कार्यकर्त्यांना आम्ही सन्मानाची वागणूक दिली

कार्यकर्त्यांना आम्ही सन्मानाची वागणूक दिली 

प्रतिनिधी /निपाणी :

ज्या कार्यकर्त्यांना आम्ही दिवंगत विलासराव देशमुख यांच्या शेजारी सन्मानाने  बसण्याची संधी दिली. तेच कार्यकर्ते आज भाजपमध्ये तिसऱया रांगेत असून रस्त्यावरून फिरत आहेत. सामान्य कार्यकर्त्यांना समाजात ताठ मानेने फिरण्याची संधी आणि सन्मानाची वागणूक आम्ही दिली. विकासकामांबरोबर कार्यकर्ता घडविण्याचे कार्य आम्ही केल्याचे प्रतिपादन काँग्रेस उमेदवार काका पाटील यांनी केले.

येथील दर्गाह गल्लीत आयोजित काँग्रेसच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांनी, एक-दोन संचालकांना आपल्याकडे घेऊन सुभाष जोशींकडून कारखाना काढून घेण्याची भाषा कोण करत असेल तर आपणही कच्च्या गुरुचे चेले नाही. विधानसभा निवडणुकीत काका पाटील यांचा विजय निश्चित आहे. त्याचबरोबर कारखाना व नगरपालिका निवडणुकीतही आमच्याकडेच सत्ता राहिल, असे सांगितले.

काँग्रेस जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी, काँग्रेस सरकारने अन्नभाग्य, क्षीरभाग्य, शुभाग्य, शिष्यवृत्ती, मुलींसाठी मोफत शिक्षण अशा अनेक सुविधा दिल्या असून या निवडणुकीतही काँग्रेसचा विजय निश्चित असल्याचे सांगितले. नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी, निपाणीत विकासकामे केल्याचा आमदार जोल्लेंचा दावा खोटा असून ही कामे आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून केल्याचे सांगितले.

यावेळी निपाणी ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजेश कदम, नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार, रोहन साळवे, शुभांगी जोशी, नजहतपरवीन मुजावर, जायेदा बडेघार, दोस्तमहंमद पठाण, अजय माने, सर्फराज बडेघर, शरीफ बेपारी, हाजी दस्तगीर कमते, किसन दावणे, पप्पू तारळे यांनी मनोगतातून काका पाटील यांना निवडून आणण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी नगरसेवक दिलीप पठाडे, धनाजी निर्मळे, अनिस मुल्ला, किरण कोकरे, शिरिष कमते, आप्पासाहेब वंजारे, सूर्यकांत फराकटे, एस. एम. वठारे, बाबू पठाण यांच्यासह सेवन स्टार युथ क्लब, बेपारी वाडा, खराडे गल्ली, चव्हाणवाडी, जामदार प्लॉट, भिमनगर, विद्यानगर, बौद्ध नगर येथील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts: