|Sunday, June 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » रवि भावे, जयदीप दत्ता, साक्षी चितलांगेसह 44 खेळाडू दोन गुणासह संयुक्त प्रथम क्रमांकावर

रवि भावे, जयदीप दत्ता, साक्षी चितलांगेसह 44 खेळाडू दोन गुणासह संयुक्त प्रथम क्रमांकावर 

प्रतिनिधी /सांगली :

नूतन बुध्दीबळ मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या 51 व्या सांगली बुध्दीबळ महोत्सवातील कै.बाबूकाका शिरगांवकर मानाकंन खुल्या बुध्दीबळ स्पर्धेत दुसऱया फेरीअखेर रवि भावे, जयदीप दत्ता, साक्षी चितलांगे, समरत घैरिया, रणवीर मोहिते, अनिश गांधी, किरण पंडितराव, वेदान्त पिंपळखरे, सारंग पाटील, समीर इनामदार, विश्वा मिश्रा, दिगंबर जेल, श्रीराज भोसले, निहालअहमद मुल्ला, स्वयंन बरेन डी, संजीव मिश्रा, अंजनेय फाटक, आयुष शिरोडकर, प्रविण सावर्डेकर, प्रज्वल कोरे, हेरंब भागवत यांच्यासह 44 खेळाडू दोन गुणासह संयुक्त प्रथम क्रमांकावर तर निमेश क्षीरसागर, यश कापडिया, अनशुल बंसती, प्रेम म्हेत्रे, अपुंर गोखले, प्रथमेश गरगरे, किशोर माने, प्रज्वल मुधाळे, आयुष महाजन, आशय खेर, श्रेयस घाडी यांच्यासह 11 खेळाडू दीड गुणांसह संयुक्त दुसऱया स्थानावर आहेत.

दुसऱया फेरीत सातारचा शार्दुल तपासे व पुण्याचा रवि भावे यांच्यातील डावाची सुरूवात राणीच्या प्यादाने झाली. सुरूवातीपासूनच दोघांनी सावध चाली रचून डावावर वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला. डावाच्या मध्यात शार्दुलला कोंडीत पकडून 36 व्या चालीला रवि भावेनी शार्दुलला डाव सोडावयास लावला.

पश्चिम बंगालचा जयदीप दत्ता व सांगलीचा अदित्य खैरमोडे यांच्यातील डावाची सुरूवात राणीच्या प्यादयाने झाली. जयदीपने रचलेल्या चालींना आदित्यने राजांकडील बाजू मजबूत करून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. अनुभवी असणाऱया जयदीपने आदित्यला हत्ती व उंटाच्या सहाय्याने आदित्यला कोंडीत पकडून 29 व्या चालीला पराभूत केले.

आंतरराष्ट्रीय महिला मास्टर साक्षी चितलांगे व पार्थ साळवी यांच्यातील डावाची सुरूवात राणीच्या प्यादयाने झाली. डावाच्या सुरूवातीला दोघांनी राजाकडील बाजू मजबूत करून चाली रचल्या. डावाच्या मध्यात साक्षीने दिलेले शह पार्थने काही प्रमाणात परतावून लावले,. अखेर अनुभवाचा फायदा उठवत पार्थला राणीच्या सहाय्याने शह देऊन 47 व्या चालीला डाव सोडायला लावला.