|Wednesday, April 24, 2019
You are here: Home » विविधा » ‘कनेक्टींग पिपल’ ; विमान प्रवासात फोनवर बोलण्यास मंजुरी

‘कनेक्टींग पिपल’ ; विमान प्रवासात फोनवर बोलण्यास मंजुरी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

आता विमान प्रवास करताना तुम्हाला तुमचा मोबाईल फ्लाईट मोडवर टाकण्याची गरज लागणार नाही कारण आता तुम्हाला विमान प्रवासादरम्यान फोनवर बोलता येणार आहे.

दूरसंचार क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करून डिजिटल उपक्रमांना प्राधान्य देण्यासाठी दूरसंचार आयोगानं उड्डाणादरम्यान मोबाइल सेवा वापराला मंगळवारी सशर्त परवानगी दिली आहे, अशी माहिती दूरसंचार विभागाच्या अधिका-यानं दिली आहेतसेच इंटरनेटचाही वापर करणं शक्मय होणार आहे. दूरसंचार विभागानं विमान उड्डाण करत असताना मोबाइलवर बोलण्याच्या परवानगीसाठी दिलेल्या प्रस्तावाला दूरसंचार नियामक प्राधिकरणा(ट्राय)नंही मंजुरी दिली आहे. दूरसंचार विभागाच्या सचिव अरुणा सुंदरराजन यांनी ही माहिती दिली. त्या म्हणाल्या, ट्रायच्या नियमांतर्गत ग्राहक तक्रार निवारण प्रणालीसाठी लोकपालालाही मंजुरी देण्यात आली आहे. लोकपालाची निवड ट्रायच्या नियमांतर्गत होणार आहे. त्यासाठी ट्राय अधिनियमांमध्ये संशोधन करणं गरजेचे आहे. आमच्याकडे तिमाहीत जवळपास 1 कोटी तक्रारी येतात. लोकपालामुळे ग्राहकांच्या तक्रारिंचं निवारण करणं सोपं जाणार आहे.

 

Related posts: