|Saturday, August 24, 2019
You are here: Home » उद्योग » एप्रिलमध्ये जीएसटी संकलन पहिल्यांदाच 1 लाख कोटीवर

एप्रिलमध्ये जीएसटी संकलन पहिल्यांदाच 1 लाख कोटीवर 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

एप्रिल महिन्यातील वस्तू आणि सेवा कर संकलन 1.03 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. 1 जुलै 2017 रोजी जीएसटी लागू करण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच जीएसटी संकलनाने लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला. त्यामुळे केंद्र सरकारला दिलासा मिळाला आहे.

जुलैमध्ये जीएसटी लागू करण्यात आल्यापासून संकलनात घसरण होत होती. अर्थव्यवस्थेत पुन्हा तेजी येत आहे आणि नवीन कर प्रणालीचे योग्य प्रकारे पालन करण्यात येत आहे, असे अर्थ मंत्रालयाकडून सांगण्यात आले. मंगळवारी अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये 1,03,458 कोटी रुपयांचे संकलन झाले. यापैकी 18,652 कोटी रुपये केंद्रीय जीएसटी, 25,704 कोटी राज्य जीएसटी आणि 50,548 कोटी रुपयांच्या संयुक्त जीएसटीचा समावेश आहे. संयुक्त जीएसटीमध्ये 21,246 कोटी रुपये आयातीच्या माध्यमातून आणि 702 कोटी रुपयांच्या आयात शुल्कासह 8,558 कोटी रुपयांचा अधिभाराचा समावेश आहे. देशपातळीवर जीएसटी लागू करण्यात आल्यास आता 10 महिने पूर्ण झाले आहेत.

नुकसानभरपाई घेणाऱया व्यावसायिकांसाठी एप्रिल महिन्यात रिटर्न भरण्याचाही होता. 19.31 लाख भरपाई घेणाऱया विक्रेत्यांनी 11.47 लाख जणांनी जीएसटीआर-4 दाखल केला. त्यांनी 579 कोटी रुपयांचा कर जमा केला असून त्याचा समावेश एकूण संकलनात आहे.

मार्च महिन्यासाठी 30 एप्रिलपर्यंत 60.47 लाख व्यावसायिकांनी जीएसटीआर 3बी रिटर्न दाखल केला. या रिटर्न भरणाऱयांची संख्या 87.12 लाख होती. 69.50 टक्के व्यावसायिकांना मार्च महिन्यासाठी जीएसटीआर 3जी दाखल केला.