|Friday, April 19, 2019
You are here: Home » क्रिडा » नेमबाज एस. रिझवी मानांकनात पहिला

नेमबाज एस. रिझवी मानांकनात पहिला 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या आयएसएसएफ विश्व मानांकनात भारतीय पुरूष नेमबाज शाझेर रिझवीने 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजांच्या मानांकनात पहिले स्थान पटकाविले आहेत. कोरियात नुकत्याच झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत रिझवीने या क्रीडा प्रकारात रौप्यपदक मिळविले होते.

रिझवीने या ताज्या मानांकनात 1654 मानांकन गुणांसह पहिले स्थान घेतले असून रशियाचा चेर्नोसोव्ह 1046 मानांकन गुणांसह दुसऱया आणि जपानचा मासुदा 803 गुणांसह तिसऱया स्थानावर आहे. या मानांकनात भारताचा जितू रॉय सहाव्या तर ओमप्रकाश मिथरवाल 12 व्या स्थानावर आहेत. महिलांच्या 50 मी. रायफल 3 पोझिशन मानांकनात भारताची अंजुम मुदगिल आठव्या स्थानावर आहे. भारताची मनु भाकर महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल मानांकनात चौथ्या स्थानावर आहे.

Related posts: