|Sunday, June 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » अमेय उच्च माध्यमिकच्या रौप्यमहोत्सवाची सांगता

अमेय उच्च माध्यमिकच्या रौप्यमहोत्सवाची सांगता 

वार्ताहर/ उसगांव

कुर्टी फोंडा येथील श्री अमेय उच्च माध्यमिक विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा समारोप सोहळय़ाची नुकतीच सांगता झाली. राजीव गांधी कला मंदिरमध्ये झालेल्या या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणतज्ञ डॉ. नारायण देसाई, गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत आदी उपस्थित हेते.

शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यांच्याशी सुसंवाद साधावा असे आवाहन प्राचार्य अनिल सामंत यांनी केले. एकाग्रता, अभ्यासाचे तंत्र आणि स्मरणशक्ती या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची खरी गरज असल्याचे सांगितले. या गोष्टींची पूर्तता करणे हे शिक्षक आणि पालकांचे मुख्य कर्तव्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.

श्री अमेय उच्च माध्यमिक संस्थेने प्रामुख्याने प्रियोळ, कुर्टी, खांडेपार, केरी, वळवई आणि वाघुर्मे या पाच ग्रामपंचायत क्षेत्रातील विद्यार्थ्यांची एक पिढी घडवण्याचे कार्य केले असून या कामाची पोचपावती संस्थेला मिळाली आहे, असे प्रतिपादन डॉ. नारायण देसाई यांनी केले. स्वातंत्र्य सेनानी कै. माधव कोरडे आणि त्यांच्या समविचारी मित्रांनी स्थापन केलेली संस्था आज यशाचे एकेक शिखर गाठताना पाहून त्यांच्या उद्दिष्ठांची पूर्तता होत असल्याचे डॉ. देसाई यांनी सांगितले.

अमेय उच्च माध्यकि विद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डायगो डिसोझा, शिक्षक सुधा देसाई, प्रेमानंद शिरोडकर, कॅसी रॉड्रिगिस, दिपिका मुत्गी, प्रभारी प्राचार्य फ्लाविया कुलासो, शिक्षक संदीप शिलकर, सुभाष जाण, सकिना केरकर, माया साळगावकर, ग्रंथपाल मेनका हजारे, कार्यालयीन कर्मचारी आशा साळुंके, मोहनदास नाईक, बाबय नाईक, सुरेश काकोडकर आणि प्राचार्य कमलाकांत परब (मरणोत्तर) यांचा डॉ. नारायण देसाई यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला.

1995 ते 2018 पर्यंत शाखांवार प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचाही या सोहळय़ात गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात अमेय उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेणाऱया माहितीपटाने झाली. यावेळी ‘अमेय’ या स्मरिणकेचे विमोचन संस्थेचे अध्यक्ष माधव सहकारी आणि उपाध्यक्ष डॉ. केशव बखले यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थीनी प्राची जठार हिने केले. त्यानंतर मनोरंजनाच्या कार्यक्रमाने रौप्य महोत्सव कार्यक्रमाची सांगता झाली.