|Friday, November 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » विभागीय क्रीडा संकुल दर्जेदार व्हावे

विभागीय क्रीडा संकुल दर्जेदार व्हावे 

राष्ट्रवादी शहर क्रीडा सेलतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण

प्रतिनिधी/ कोल्हापूर

गेल्या सात वर्षांपासून शासन व प्रशासनाचे संभाजीनगर येथील विभागीय क्रीडा संकुलच्या विकास कामाकडे दुर्लक्ष झाले आहे. सध्या 30 टक्केही काम पूर्ण झाले नसल्यामुळे दुरावस्था बनली आहे. ही दुरावस्था थांबवून दर्जेदार क्रीडा संकुल उभारावे, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी क्रीडा सेलचे अध्यक्ष सुहास साळोखे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. यानंतर शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निवेदन देण्यात आले. 

या निवेदनात म्हटले आहे, संभाजीनगर येथील विभागीय क्रीडा संकुलच्या विकास कामाला 2009 मध्ये सुरूवात झाली. याला सात वर्षांचा कालावधी लोटला आहे. शासनाकडून सुमारे 24 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यातील क्रीडा संकुलच्या विकास कामावर आत्तापर्यंत सुमारे 17 कोटी रूपये खर्च झालेले आहेत आणि 76 टक्के काम पूर्ण झाले असल्याचा दावा शासनाने केला आहे.  क्रीडाप्रेमी, खेळाडू व राष्ट्रवादी क्रीडा सेल यांच्या संयुक्त विद्यमाने या क्रीडा संकुलची पाहणी केली असून प्रत्यक्षात 30 टक्केच काम पूर्ण झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत वेळोवेळी जिल्हाधिकारी, क्रीडा उपसंचालक, जिल्हा क्रीडा अधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर चर्चा केली आहे. याकडे अक्ष्यम्य दुर्लक्ष होत असल्यामुळे उपोषणाचा निर्णय घेण्यात आला. तरी याकडे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोषींवर व भ्रष्ट अधिकाऱयांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यामध्ये देण्यात आला आहे. विभागीय क्रीडा उपसंचालक अनिल चोरमल यांना शिष्टमंडळाने विचालेल्या प्रश्नांना उत्तरे देता आली नसल्याने निरुत्तर झाले. यावेळी माजी महापौर आर.के.पोवार,शहर अध्यक्ष राजेश लाटकर, अनिल घाटगे, जयकुमार शिंदे, संजय कुराडे, संजय पडवळे, अभिषेक शिंदे, उत्कर्ष बचाटे आदी उपस्थित होते.  

Related posts: