|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘स्वाभिमान’ची वेंगुर्ले कार्यकारिणी जाहीर

‘स्वाभिमान’ची वेंगुर्ले कार्यकारिणी जाहीर 

प्रतिनिधी / वेंगुर्ले:

स्वाभिमान पक्षाच्या वेंगुर्ले तालुका कार्यकारिणीची मासिक बैठक बुधवारी तालुका संपर्क कार्यालयात तालुकाध्यक्ष मनिष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी स्वाभिमान पक्षाची उर्वरित तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली.

यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती प्रीतेश राऊळ, सारिका काळसेकर, बाबली वायंगणकर, वसंत तांडेल, जयंत मोंडकर, भूषण सारंग, शीतल आंगचेकर, कृपा मोंडकर, पूनम जाधव, महिला शहराध्यक्षा गौरी पाटील, सरपंच पपू परब, नीलेश सामंत, नाथा मडवळ, समीर कुडाळकर, सायमन आल्मेडा, श्वेता चव्हाण आदी होते.

यावेळी निवडण्यात आलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे-तालुका उपाध्यक्ष बाबली वायंगणकर, नीलेश सामंत, शहराध्यक्ष जयंत मोंडकर विभागीय अध्यक्ष नितीन चव्हाण (तुळस), अमित गावडे (शिरोडा), नाथा मडवळ (म्हापण), गाव अध्यक्ष- प्रसाद पाटकर (परुळे), गोविंद गडेकर (रेडी), वामन भोसले (वजराठ), तालुका कार्यकारिणी सदस्य- सागर राणे, मयुरेश शिरोडकर बाळू फटनाईक.

यावेळी तालुक्यात पक्ष मजबूत करण्यासंदर्भांत चर्चा करण्यात आली. तसेच मयत नीलम राऊळ यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेण्याचे ठरविण्यात आले.