|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र प्रेरणादायी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र प्रेरणादायी 

प्रतिनिधी/ खंडाळा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र प्रत्येक व्यक्तिला प्रेरणादायी असून त्यांचे स्मरण हे स्फुर्ती, तर विस्मरण म्हणजे अधःपतन  आहे. यापासून वाचायचं असेल तर त्यांच्या विचारांची प्रेरणा घेतली पाहिजे, असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यीक डॉ. सतिश कुलकर्णी यांनी बोलताना केले.

शिरवळ येथे फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रसारक मंडळाच्या शाखेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य ज्योतीबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्ता विचार महोत्सव आयोजित करण्यात आला होता. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.

यावेळी डॉ. सतिश कुलकर्णी, नामदेवराव शिंदे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र तांबे, माजी उपजिल्हा प्रमुख प्रदीप माने, सरपंच लक्ष्मीताई पानसरे, उपसरपंच दिलीप गुंजवटे, प्रकाश परखंदे, माजी सरपंच छाया जाधव, रोहिदास जाधव, महादेव कांबळे, नितिन कदम, दादासाहेब कांबळे, युवराज खुंटे, ऍड. इम्तियाज खान, राहुल बधे, अजय कांबळे, सुजीत कडाळे, सुजाता भालेराव, कर्नवडी सरपंच रेखा कांबळे, वंदना कडाळे,आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ. कुलकर्णी म्हणाले, बाबासाहेबांची जयंती नव्हे, तर देशातील तमाम दलित मुक्तीची जयंती आहे. जगाचे नेते बाबासाहेब आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण प्रत्येक दिवशी केले पाहिजे. बाबासाहेबांच्या विचारापासुन दूर न जाता प्रेरणा घेत फुले – आंबेडकर यांचे विचार नटवू या.

प्रास्ताविक खरात यांनी व सूत्रसंचालन छाया जावळे, अजय कांबळे यांनी आभार मानले.

Related posts: