|Thursday, January 17, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » सॅमसंगचे दोन नवे स्मार्टफोन लाँच

सॅमसंगचे दोन नवे स्मार्टफोन लाँच 

ऑनलाईन टीम / मुंबई :

दक्षिण कोरियाई कंपनीने दोन स्मार्टफोन Samsung Galaxy A6 आणि Galaxy A6+ लॉन्च केले आहेत. ग्लोबल साईटवर याचे स्पेसिफिकेशन आणि फिचर्स जाहिर करण्यात आले आहेत. या फोन्सचे वैशिष्ट्य म्हणजे याचा कॅमेरा आणि डिजाईन. हा हॅंडसेट ब्लॅक, गोल्ड, ब्लू आणि लवेंडर रंगात उपलब्ध आहे.

दोन्ही हॅंडसेटमध्ये सुपर एमोलेड इनफिनिटी डिस्प्ले देण्यात आला आहे.हाच डिस्प्ले पूर्वी Galaxy S, Galaxy Note आणि Galaxy A8 सिरीजमध्ये देण्यात आला होता. Samsung Galaxy A6 मध्ये 5.6 इंचाचा डिस्प्ले आहे. तर Samsung Galaxy A6+ मध्ये 6.0 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. दोघांचाही आस्पेक्ट रेशो 18:5:9 आहे.हा फोन अॅनरॉईड 8.0 ओरियोवर चालतो. यात असणारा ऑक्टा-कोर प्रोसेसर, ज्याचा सर्वाधिक स्पीड Samsung Galaxy A6 साठी 1.6 गीगाहर्ट्ज़ आणि Samsung Galaxy A6+ साठी 1.8 गीगाहर्ट्ज आहे. दोन्ही हॅंडसेटमध्ये 32 जीबी व 64 जीबी मेमरी देण्यात आली आहे. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने हे स्टोरेज 256 जीबी पर्यंत वाढवता येईल. फोनमध्ये बिक्सबी, बिक्सबी विजन, होम आणि रिमाईँडरची सुविधा देण्यात आली आहे.

Related posts: