|Friday, April 19, 2019
You are here: Home » Top News » यूपी, राजस्थानमध्ये पावसाचा थैमान ; 70 जणांचा मृत्यू

यूपी, राजस्थानमध्ये पावसाचा थैमान ; 70 जणांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / जयपूर :

उत्तर भारत, दक्षिण भारतात त्याचबरोबर दिल्ली-एनसीआरमध्ये हवामानात अचानक बदल पहायला मिळत आहे. राज्यस्थान, पश्चिम बंगाल,आंध्र प्रदेश, पंजाब ,हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे 72 जणांचा मृत्यू झाला आहे.

उत्तर प्रदेशात मृत्यू झालेल्यांची संख्या 45 आहे तर 38 जण जखमी झाले आहेत. दुसरीकडे आगऱयामध्ये 36 जणांचा मृत्यू झाला आहे. बिजनौर, शहाँरानपूर, बरेलीमध्ये एकुण नऊ जणांचा मृत्यू झाला. राजस्थानमध्येही वादळ व पावसाचा कहर कायम आहेत. राजस्थानमध्ये 27 जणांचा मृत्यू झाला असून 100 जण जखमी झाली आहेत. अलवर, भरतपूर आणि भोलपूर जिह्यामध्ये विजेचे खांब व अनेक झाडं पडल्याचं वृत्त आहे. यापैकी नऊ जणांचा भरपूरमध्ये मृत्यू झाला. तीन जण अलवर, तीन जण भरतपूर आणि दोन जण झुंझुनूमध्ये दगावली आहेत.

 

 

 

 

 

 

Related posts: