|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » ‘टाटा’ला रोखण्यासाठी ‘टास्क फोर्स’

‘टाटा’ला रोखण्यासाठी ‘टास्क फोर्स’ 

बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांची समितीच्या बैठकीत माहिती

मुंबई / प्रतिनिधी

बेस्ट वीज विभागाचे शहर हद्दीतील ग्राहक आपल्याकडे वळविणाऱया टाटा वीज कंपनीला रोखण्यासाठी व आपले वीज ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी बेस्ट उपक्रमाने खास ‘टास्क फोर्स’ कार्यरत केला आहे, अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी गुरुवारी बेस्ट समितीच्या बैठकीत दिली.

बेस्ट उपक्रमातील परिवहन विभाग गेल्या काही वर्षांपासून कोटय़वधी रुपयांनी तोटय़ात असून दुसरीकडे फायद्यात असलेल्या वीज विभागाचे शहर हद्दीतील वीज ग्राहक टाटा वीज कंपनी वीज कायद्यातील बदलाचा लाभ घेत आपल्याकडे खेचून नेत आहेत. त्याचे पडसाद गुरुवारी बेस्ट समितीच्या बैठकीत उमटले. पूर्वी बेस्ट वीज विभागच शहर हद्दीतील वीज ग्राहकांना वीजपुरवठा करीत होता. मात्र, वीज कायद्यात सरकारने केलेल्या सुधारणांचा लाभ घेत टाटा वीज कंपनीने बेस्टचे वीज ग्राहक आपल्याकडे वळविण्यास सुरुवात केली. त्याचा धसका बेस्टने घेतला. बेस्ट समितीने मागील व आजच्या बैठकीतही या विषयावर गंभीरपणे चर्चा केली.

टाटा कंपनीने बेस्टचे ग्राहक आपल्याकडे खेचण्यासाठी बेस्ट वीज विभागातीलच निवफत्त अधिकाऱयांना आपल्याकडे नोकरी देण्यास सुरुवात केली आहे, अशी तक्रार काही सदस्यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत केले. त्यावर महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी बेस्टकडून टाटाला रोखण्यासाठी खास तज्ञ अधिकाऱयांची ‘एक टास्क फोर्स’ कार्यरत केल्याची माहिती दिली. या टास्क फोर्समधील कोणीही अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करत असतील तर त्यांची चौकशी करण्यात येईल, असे बागडे यांनी सांगितले.

बेस्टमधून निवफत्त झाले अधिकारी, कर्मचारी हे टाटा वीज कंपनीकडे जात आहेत. त्यामुळे त्यांना बेस्टच्या कारभाराची सविस्तर माहिती मिळते. दादर येथील एका विकासकाला इमारतीसाठी विजेची गरज होती. त्याला बेस्टकडून 27 लाख रुपयांचे कोटेशन देण्यात आले. नंतर तो विकासक टाटाकडे गेला असता त्याला 7 लाख रुपयात वीज देण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे बेस्ट वीज विभागातील अधिकारीच बेस्टला तोटय़ात घालत आहेत.

 सुनील गणाचार्य, बेस्ट समिती सदस्य 

परिवहन विभाग तोटय़ात असतानाच विद्युत विभागही तोटय़ात जात असून याला जबाबदार कोण ?

अनिल कोकीळ, शिवसेना नगरसेवक