|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » स्व.एकनाथ ठाकुर स्मृती पुरस्काराचे 13 रोजी वितरण खासदार डॉ. नरेंद जाधव पुरस्काराचे मानकरी

स्व.एकनाथ ठाकुर स्मृती पुरस्काराचे 13 रोजी वितरण खासदार डॉ. नरेंद जाधव पुरस्काराचे मानकरी 

वार्ताहर / वेंगुर्ले:

कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गिरगाव व बॅ. नाथ पै शिक्षण संस्था, कुडाळ यांच्यातर्फे दिल्या जाणाऱया ‘स्व. एकनाथ ठाकुर स्मृती पुरस्कार 2018’ चे वितरण रविवारी 13 रोजी सायंकाळी 6 वाजता करण्यात येणार आहे. हा सोहळा एकनाथ ठाकुर भवन, संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहे.

  स्व. एकनाथ ठाकुर स्मृती पुरस्कार हा ज्येष्ठ अर्थतज्ञ, खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांना जाहीर करण्यात आलेला आहे. यावेळी सोनाली राजाराम गावडे हिचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. पुरस्काराचे वितरण ‘तरुण भारत’चे सल्लागार समूहप्रमुख किरण ठाकुर व मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी ओमप्रकाश शेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी प्रफुल्ल वालावलकर, अनिल आंबेसकर, का. आ. सामंत, विलास कुडाळकर, प्रदीप देसाई आदी उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार वितरणनंतर सायंकाळी 7.30 वाजता डॉ. नरेंद्र जाधव यांची प्रकट मुलाखत प्रदीप देसाई घेणार आहेत. यावेळी एकनाथ ठाकुर पेमींनी उपस्थित राहवे, असे आवाहन डॉ. अमेय देसाई व उमेश गाळवणकर यांनी केले आहे.