|Saturday, August 24, 2019
You are here: Home » उद्योग » चालू वर्षाअखेरपासून 5जी चाचणीस प्रारंभ

चालू वर्षाअखेरपासून 5जी चाचणीस प्रारंभ 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय दूरसंचार कंपन्या चालू वर्षाच्या अखेरपासून 5जी तंत्रज्ञानाची चाचणी करण्यास प्रारंभ करतील असे फिनीश कंपनी नोकियाने म्हटले. कंपनीकडून आपल्या चेन्नईमधील प्रकल्पात सध्या 5जी तंत्रज्ञानाची चाचणी करण्यात येत आहे. 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर नियमावली जाहीर करण्यात आल्यानंतर साधारण काही महिन्यांत भारतात याची घोषणा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

सध्या 5जी तंत्रज्ञानाचा वापर कोणकोणत्या क्षेत्रात करता येऊ शकतो याची माहिती दूरसंचार कंपन्यांना देण्यात येत आहे. 2020 पर्यंत देशात 5जी लागू करण्यासाठी सरकारने लक्ष्य ठेवले आहे. यासाठी जूनमध्ये 5जी धोरण जाहीर करण्यात येईल. मात्र सध्या या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात कर्ज असून सरकारकडून काही प्रमाणात मदत करण्यात यावी अशी अपेक्षा आहे. सध्या भारतात 1 पेटाबाईट्स डेटाचा वापर करण्यात येत असून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा पहिला क्रमांक लागतो. देशातील काही भागात अजूनही इंटरनेटचा प्रसार झाला नसून त्यांना जोडणे हे मोठे आव्हान आहे.