|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » क्रिडा » पोर्तुगालचा सोसा अजिंक्य

पोर्तुगालचा सोसा अजिंक्य 

वृत्तसंस्था/ इस्ट्रॉईल

रविवारी पोर्तुगालच्या जोआओ सोसाने इस्ट्रॉईल खुली पुरूषांची एटीपी टेनिस स्पर्धा जिंकली. मायदेशात होणारी ही स्पर्धा जिंकणारा सोसा हा पोर्तुगालचा पहिला टेनिसपटू आहे.

29 वर्षीय सोसाने अंतिम सामन्यात अमेरिकेच्या फ्रान्सिस टिफोईचा 6-4, 6-4 असा पराभव केला. सोसाने या सामन्यातील पहिल्या सेटमधील शेवटच्या गेममध्ये तीन ब्रेक पॉईंटस् वाचविले. सोसाच्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीतील हे तिसरे विजेतेपद आहे. त्याने 2015 साली व्हॅलेन्सियातील तर 2013 साली कौलालंपूर येथील स्पर्धा जिंकल्या होत्या. एटीपीच्या मानांकन यादीत सोसा 38 व्या स्थानावर आहे. सोसाने या स्पर्धेत अंतिम फेरी गाठताना ग्रीकच्या सिटसिपेसचा पराभव केला. 2018 च्या टेनिस हंगामात सोसाने आतापर्यंत 18 सामने जिंकले असून 10 सामने गमविले आहेत.