|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » दहावीत बेळगाव शैक्षणिक जिल्हा सहावा

दहावीत बेळगाव शैक्षणिक जिल्हा सहावा 

बेळगाव/ प्रतिनिधी

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा असणाऱया दहावी परीक्षेचा निकाल ऑनलाईनवर सोमवारी जाहीर झाला. या निकालानुसार बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ाने सहाव्या क्रमांकावर येऊन आपला मान उंचावला आहे. मागील वषी जिल्हय़ाची 25 व्या क्रमांकावर झालेली घसरण भरून निघाली आहे. येथील सेंट झेवियर्स शाळेच्या मोहम्मद कैफ मुल्ला याने 625 पैकी 624 गुण मिळवून संपूर्ण राज्यात द्वितीय तर बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ाचा एकूण निकाल 84.77 टक्के लागला आहे. यामध्ये यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे.

सोमवारी सकाळी 11 वा. माध्यमिक शिक्षण परीक्षा मंडळाच्यावतीने निकाल  ऑनलाईनवर जाहीर करण्यात आला. यामध्ये बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ाचा 84.77 टक्के निकाल लागला असून, राज्यात जिल्हय़ाने सहावा क्रमांक मिळविला आहे. मागील वषी जिल्हय़ाची 25 व्या क्रमांकावर घसरण झाली होती. चिकोडी शैक्षणिक जिल्हय़ाने राज्यात आपला तिसरा क्रमांक यंदाही कायम राखला आहे. मागील वषी बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ाची एकूण टक्केवारी 71.2 होती. यामध्ये यंदा 13 टक्क्मयांहून अधिक वाढ झाली आहे. राज्याचा एकूण निकाल 71.93 टक्के लागला आहे. राज्यात पैकीच्या पैकी गुण मिळविणारे 2 विद्यार्थी आहेत तर एकूण 8 विद्यार्थ्यांनी 624 गुण मिळवून संपूर्ण राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. यामध्ये येथील सेंट झेवियर्सचा विद्यार्थी मोहम्मद कैफ मुल्ला याचाही समावेश आहे. संपूर्ण बेळगावकरांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे.

सोमवारी सकाळी 11 नंतर 10 वीचा ऑनलाईन निकाल शिक्षण खात्याच्यावतीने जाहीर करण्यात आला. मंगळवारी सर्व माध्यमिक शाळांमध्ये 10 वीचा निकाल उपलब्ध होणार आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ाची यंदा निकालात सुधारणा झाली आहे. गेल्या 3 वर्षांनंतर बेळगाव जिल्हय़ास पहिल्या 10 मध्ये स्थान मिळविता आले. सोमवारी ऑनलाईनवर निकाल जाहीर होताच निकाल पाहण्यासाठी शहरातील बऱयाच सायबर कॅफेवर विद्यार्थ्यांची गर्दी दिसून आली.

24 हजार 853 विद्यार्थी उत्तीर्ण

बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात एकूण 104 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेसाठी एकूण 31 हजार 61 विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. मात्र, यापैकी 28 हजार 618 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी 24 हजार 853 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 12 हजार 356 मुले आणि 12 हजार 497 मुलींचा समावेश आहे.