|Saturday, February 23, 2019
You are here: Home » Top News » स्मार्ट सिटीत चक्क शौचालये गेली चोरीला

स्मार्ट सिटीत चक्क शौचालये गेली चोरीला 

ऑनलाईन टीम / पिंपरी-चिंचवड

स्मार्ट सिटी म्हणल्या जाणाऱया पिंपरी-चिंचवड शहरात चक्क शौचालय चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. ताथवडेत चक्क शौचालय चोरीला गेल्याचा अजब प्रकार घडला आहे. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वच्छ सर्वेक्षण स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत महापालिकेने लोकांची वर्दळ पाहता मुंबई-बंगळूर महामार्गावर ताथवडे येथील चौकात सेवा रस्त्याच्या दुतर्फा 11 नोव्हेंबर 2017 रोजी तब्बल 15 लाख रूपये खर्चून लोखंडी ट्रॉलीत प्रत्येकी पाच फिरती शौचालये ठेवण्यात आली होती. शौचालयाचा वापर नागरिक करत मात्र 11 एप्रिल रोजी आरोग्य विभागाचे कर्मचारी येथील साफ सफाई गेले असता ट्रॉलीसह शौचालय गायब असल्याचे दिसले. याबाबत कर्मचाऱयांनी वरिष्ठांना कळविल्यानंतर या सर्वांनी मिळून परिसर पिंजून काढला. मात्र हाती काहीच लागले नाही. यानंतर त्यांनी पोलिसांची मदत घेतली. त्यांनीही सुरुवातीला शोधाशोध केली असून हाती काहीच लागत नसल्याने अखेर सोमवारी हे शौचालये चोरीचा गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस दफ्तरी या ट्रॉलीसह शौचालयाची किंमत दीड लाख नोंदविण्यात आली आहे.

Related posts: