|Thursday, August 22, 2019
You are here: Home » क्रिडा » टिम पेन वनडे, फिंच टी-20 संघाचा कर्णधार

टिम पेन वनडे, फिंच टी-20 संघाचा कर्णधार 

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्टेलियाचे वनडे, टी-20

वृत्तसंस्था/ सिडनी

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कसोटी कर्णधार टिम पेनची पुढील महिन्यात होणाऱया इंग्लंड दौऱयातील वनडे मालिकेसाठीही कर्णधारपदी निवड केली आहे तर टी-20 संघाचे नेतृत्व ऍरोन फिंचकडे देण्यात आले आहे. मात्र पुढील वषी होणाऱया वनडे विश्वचषक स्पर्धेसाठी नेतृत्वाची जबाबदारी कोणावर सोपवणार याचा अद्याप निर्णय निवड समितीने घेतलेला नाही.

इंग्लंड दौऱयात पाच वनडे सामन्यांची मालिका होणार असून यासाठी 15 सदस्यीय संघाची मंगळवारी घोषणा केली. बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतरची ही पहिलीच मालिका असून या प्रकरणात दोषी ठरलेल्या स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर व कॅमेरॉन बँक्रॉफ्ट यांच्यावर बंदीची कारवाई करण्यात आली आहे. निवड समितीने वनडेच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी ऍरोन फिंचवर सोपविली. याशिवाय त्याची टी-20 संघाच्या कर्णधारपदीही नियुक्ती केली आहे. 13 ते 27 जून या कालावधीत ऑस्ट्रेलिया इंग्लंडविरुद्ध पाच वनडे व एक टी-20 सामना खेळणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ झिम्बाब्वे दौऱयावर टी-20 तिरंगी मालिकेसाठी जाणार आहे. पाकिस्तान यातील तिसरा संघ असेल. ही मालिका 1 जुलैपासून सुरू होणार आहे.

‘टिम हा भक्कम नेता असून या मालिकेत तो ऍरोनच्या साथीने संघाचे नेतृत्व सांभाळेल,’ असे निवड सदस्य टेव्हर हॉन्स म्हणाले. वनडे संघासाठी कायमस्वरूपी  कर्णधाराची निवड लवकरच केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. याआधी स्मिथने तिन्ही प्रकारांत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व सांभाळले होते. पण यष्टिरक्षक असलेल्या टिम पेनबाबत असे केल्यास त्याच्यावर फार मोठे ओझे पडण्याची शक्मयता आहे. टॅम्परिंग प्रकरणानंतर टिम पेनची घाईघाईने कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. दक्षिण ऑस्ट्रेलियाचा ऍलेक्स कॅरे हा यष्टिरक्षक फलंदाज असून त्यालाही वनडे संघात निवडण्यात आले आहे. पण इंग्लंडमध्ये टिम पेनच यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळणार आहे.

या संघात डावखुरा सलामीवीर डीआर्सी शॉर्ट हा नवोदित खेळाडू असून त्याने गेल्या फेब्रुवारीत न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत प्रभावी प्रदर्शन केले होते. कसोटी स्पिनर नाथन लियॉनला 2016 नंतर प्रथमच पुन्हा संघात स्थान देण्यात आले आहे. ‘इंग्लंड संघात अनेक डावखुरे खेळाडू असून इंग्लिश वातावरणात पांढऱया चेंडूवर लियॉन त्यांच्याविरुद्ध काय करामत करतो, हे पाहण्यास आम्ही उत्सुक आहोत,’ असे हॉन्स म्हणाले. दक्षिण आफ्रिका दौऱयात जखमी झालेले मिशेल स्टार्क व पॅट कमिन्स या वेगवान गोलंदाजांशिवाय ऑस्ट्रेलिया संघ इंग्लंडला जाणार आहे. संयुक्त अरब अमिरातमध्ये पाकिस्तानविरुद्ध होणाऱया कसोटी मालिकेसाठीच ते पुनरागमन करण्याची शक्यता आहे. केन रिचर्डसन, झाय रिचर्ड, अँड्रय़ू टाय, बिली स्टॅन्लेक या नवोदित जलद गोलंदाजांचे नेतृत्व जोश हेजलवुड करेल. टी-20 संघातही अष्टपैलू जॅक विल्डरमुथ व  स्पिनर मिशेल स्वेप्सन या दोन नवोदितांना संधी मिळाली आहे.

ऑस्ट्रेलिया वनडे संघ : टिम पेन (कर्णधार), ऍरोप फिंच, ऍश्टन ऍगर, ऍलेक्स कॅरे, हेजलवुड, ट्रव्हिस हेड, लियॉन, मॅक्सवेल, शॉन मार्श, झाय रिचर्डसन, केन रिचर्डसन, डीआर्सी शॉर्ट, स्टॅन्लेक, स्टॉइनिस, ऍन्ड्रय़ू टाय.

टी-20 संघ : ऍरोन फिंच (कर्णधार), ऍलेन्स कॅरे, ऍगर, हेड, निक मॅडिन्सन, मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, केन रिचर्डसन, डीआर्सी शॉर्ट, स्टॅन्लेक, स्टॉइनिस, स्वेप्सन, टाय, जॅक विल्डरमुथ.

संघ घोषित