|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सावलीने सोडली साथ

सावलीने सोडली साथ 

झिरो शॅडो डे कोल्हापूरातून सुरुवात

प्रतिनिधी/ कोल्हापूर

पृथ्वीवर मकरवृत्ताच्या दक्षिणेकडच्या भागात तर कर्कवृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीच डोक्यावर येत नाही. तो सदैव क्रमश:उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे दिसतो. या दोन टोकांच्या वृत्तामधल्या लोकांना मात्र वर्षातून दोनदा सूर्य डोक्यावर अनुभवायला मिळतो. त्यावेळी सूर्य बरोबर डोक्यावर येतो आणि आपली सावली सरळरेषेत आपल्या पायाखाली पडते.शून्य सावलीचा हा अनुभव सोमवारी कोल्हापूरकरांनी अनुभवला.

कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दोन वृत्तामध्ये राहणाऱया लोकांना वर्षातून दोनवेळा शून्य सावली अनुभवायला मिळते. कर्कवत्त, मकरवृत्त आणि विषुववृत्तावर राहणाऱया लोकांना वर्षातून एकदाच झिरो शॅडोचा अनुभव घेता येतो. पृथ्वी ज्या अक्षाभोवती फिरते त्याला 23. 5 डिग्री एवढा कल आहे.पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्याच्या मार्गाला आमनिक वृत्त म्हणात. पृथ्वी ही कर्कवृत्तावरुन  बरोबर तीन महिन्यांनी वसंत संचात बिंदूपाशी येते. यादिवशी 12 तासांचा दिवस व 12 तासांची रात्र असते. त्यावेळी सूर्याची किरणे विषुववृत्तावरुन पडतात.त्यामुळे विषुववृत्तावर कुठेही उभारल्यास आपली सावली गायब होते. सोमवारी कोल्हापूरात शून्य सावली अनुभवायला मिळाली. दुपारी साडेबाराच्या सुमारास सूर्य बरोबर डोक्यावर  आल्यावर सावली पायाखाली आली आणि काहीवेळ सावलीने साथ सोडली.

Related posts: