|Thursday, January 17, 2019
You are here: Home » Automobiles » स्विफ्ट,बलेनोत बिघाड,तब्बल 52 हजार कार परत मागवल्या

स्विफ्ट,बलेनोत बिघाड,तब्बल 52 हजार कार परत मागवल्या 

ऑनलाईन टीम / मुंबई :

तांत्रिक बिघाडामुळे मारूती कंपनीने सुझुकीच स्विफ्ट आणि बलेनो कार परत मागवल्याची माहिती समोर आली आहे. तब्बल 52 हजार 686 गाडय़ा परत मागवल्यात आहेत.

या सर्व कार 1 डिसेंबर 2017 ते 16 मार्च 2018या दरम्यान बनवल्या आहेत. यापैकी काही कारमध्ये बिघाड असल्यामुळे तक्रारी कंपनीकडे आल्या होत्या. वाढत्या तक्रारीमुळे कंपनीने तब्बल 52 हजार 686 गाडय़ा परत मागवल्या आहेत. ‘ज्या गाडय़ांमध्ये बिघाड झाला आहे. त्यांच्यासाठी एक कॅम्पने सुरू करण्यात येईल.त्यानूसार तो बिघाड दुरूस्त केला जाईल, असे कंपनीने म्हटले आहे. या गाडय़ा ज्यांनी ज्यांनी खरेदी केल्या आहेत. त्या ग्राहकांशी कंपनी 14 मे 2018 पासून संपर्क साधणार आहे.

 

Related posts: