|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » उद्योग » एअरटेल तीन वर्षात 4.6 अब्ज डॉलर्सचे कर्ज घटविणार

एअरटेल तीन वर्षात 4.6 अब्ज डॉलर्सचे कर्ज घटविणार 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पुढील तीन वर्षात 4.6 अब्ज डॉलर्सने कर्ज घटविण्याच्या योजनेवर काम सुरू असल्याचे भारती एअरटेलकडून सांगण्यात आले. आफ्रिका खंडातील व्यवसाय सूचीबद्ध करण्यात येईल आणि टॉवर व्यवसायातील काही वाटा विक्री करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

भारतातील दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपनी ऑफ्रिका खंडातील व्यवसायासाठी दक्षिण आफ्रिका अथवा लंडनमध्ये आयपीओ आणणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून 2019 च्या सुरुवातीला आयपीओ आणत 1.5 अब्ज डॉलर्स उभारण्यात येतील. भारती इन्फ्राटेल आणि इन्डस टॉवर्सचे विलीनीकरण पूर्णत्वास गेल्यानंतर काही हिस्सा विक्री करण्यात येईल. आयपीओ आणि टॉवर्समधील हिस्सा विक्रीस आणल्यानंतर कंपनीचा ताळेबंद सुधारण्यास मदत होईल. गेल्या चार वर्षात कंपनीचे एकूण कर्ज 45 टक्क्यांनी वाढ 14.6 अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे. रिलायन्स जिओचा प्रवेश आणि स्पेक्ट्रमची खरेदी करण्यासाठी कंपनीने मोठय़ा प्रमाणात कर्ज घेतले.

रिलायन्स जिओकडून वाढती स्पर्धा आणि ब्रॉडबॅन्डचा विस्तार करण्यासाठी मार्च 2019 पर्यंत कंपनीकडून 240 अब्ज रुपयांचा खर्च करण्यात येईल. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीन 250 अब्ज रुपयांची गुंतवणूक केली होती. 2016 मध्ये भारती एअरटेलने बुर्किना फासो आणि सीएरा लीओनमधील व्यवसाय विक्री करत 1 अब्ज डॉलर्स आणि आफ्रिकेतील टॉवर संपत्तीच्या विक्रीने 2 अब्ज डॉलर्स उभारले होते.