|Monday, January 21, 2019
You are here: Home » leadingnews » पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवशीय नेपाळ दौऱयावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवशीय नेपाळ दौऱयावर 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नेपाळ दौऱयावर गेले आहेत. मोदींचे तेथे औपचारिक स्वागत करण्यात आले आहे.

मोदींनी जनकपूर येथील जानकी मंदिरामध्ये विशेष पूजा केली. या भेटीदरम्यान, मोदींनी जनकपूर-अयोध्या या बससेवेला हिरवा झेंडा दाखवत तिचे औपचारिक उदघाटन केले. त्यानंतर ते काठमांडू येथील बैठकांमध्ये सहभागी होतील. दरम्यान, जनकपूर येथे मोदींना पाहण्यासाठी नेपाळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मोदींच्या जानकी मंदिर दौऱयादरम्यान नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली हेसुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित होते. मागील काही वर्षांमध्ये भारत आणि नेपाळ यांच्यातील द्विपक्षीय संबंधांमध्ये काहीशी कटुता आली आहे. त्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. भारत आणि नेपाळ संबंध पुन्हा मधूर बनवण्यावर मोदींचा भर असेल. तसेच नेपाळमध्ये भारताच्या सहकार्याने सुरू असलेल्या योजनांची तात्काळ सुरूवात करण्यावर मोदी जोर देणार आहेत. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मोदी म्हणाले, अयोध्या आणि जनकपूरचे पिढय़ान पिढय़ांचे अतूट नाते आहे. येथे एकादशीच्या दिवशी येथे येता आले हे मी माझे भाग्य समजतो. आता भारत आणि नेपाळ एकत्र येऊन दोन्ही देशांमध्ये सर्किट बनवण्याच्या दिशेने काम करतील. तसेच नेपाळचे पंतप्रधान काठमांडूहून येथे आले, त्यांचेही मी आभार व्यक्त करतो.

Related posts: