|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मुख्यमंत्री विप्लव देव यांचे आणखी एक वादग्रस्त विधान

मुख्यमंत्री विप्लव देव यांचे आणखी एक वादग्रस्त विधान 

अगरतळा

 त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव यांनी 23 दिवसांच्या कालावधीत 5 व्यांदा वादग्रस्त विधान केले. उदयपूर येथे आयोजित एका सभेत बोलताना त्यांनी इंग्रजांच्या विरोधादाखल टागोर यांनी नोबेल पुरस्कार परत केला होता असे म्हटले आहे. विप्लव यांच्या या विधानावर विरोधी पक्ष माकप तसेच काँग्रेसने टीकेची झोड उठविली आहे. इंग्रजांच्या विरोधादाखल गुरुदेवांनी नोबेल पुरस्कार परत केल्याचे विधान करताना विप्लव एका चित्रफितीत दिसून येतात. टागोर यांना 1913 मध्ये गीतांजलिसाठी नोबेल पुरस्कार मिळाला होता. त्यांनी हा पुरस्कार कधीच परत केला नव्हता. परंतु 1919 मध्ये जालियानवाला बाग येथे झालेल्या हत्याकांडाच्या विरोधात टागोर यांनी इंग्रजांकडून देण्यात आलेल्या नाइटहुडचा सन्मान परत केला होता.

 

Related posts: