|Thursday, July 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सहा आठवडय़ांसाठी लालूंना तात्पुरता जामीन

सहा आठवडय़ांसाठी लालूंना तात्पुरता जामीन 

रांची / वृत्तसंस्था

चारा घोटाळा प्रकरणातील आरोपी राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना सहा आठवडय़ांसाठी तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला आहे. आरोग्याच्या कारणास्तव त्यांना तुरुंगातून सोडण्यात येत असल्याचे झारखंड उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अप्रेश कुमार सिंग यांनी स्पष्ट केले. लालूंच्या वतीने वकील प्रभात कुमार यांनी न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडली.

लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांच्या पुत्राचा विवाह समारंभ शनिवारी पटना येथे होणार आहे. या विवाहाच्या निमित्ताने त्यांना यापूर्वीच तीन दिवसांसाठी पॅरोल मंजूर करण्यात आला होता. ही पॅरोलची मुदत संपण्यापूर्वीच तात्पुरता जामीन मंजूर झाल्याने लालूंना मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत चारा घोटाळय़ातील तीन खटल्यांमध्ये लालू दोषी ठरले असून 23 डिसेंबरपासून ते रांची येथील बिरसा मुंडा कारागृहात कैद होते.