|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » क्रिडा » मँचेस्टर युनायटेड दुसऱया स्थानी

मँचेस्टर युनायटेड दुसऱया स्थानी 

वृत्तसंस्था/ लंडन

प्रिमियर लिग फुटबॉल स्पर्धेत मँचेस्टर युनायटेड संघाला दुसऱया स्थानावर समाधान मानावे लागले. गुरुवारी येथे झालेल्या सामन्यात वेस्टहॅमने मँचेस्टर युनायटेडला गोलशुन्य बरोबरीत रोखले. हा सामना अनिर्णीत राहिल्याने मँचेस्टरला महत्त्वाचा एक गुण मिळू शकला नाही. या सामन्यात मँचेस्टर युनायटेडच्या पोग्बाला तसेच वेस्टहॅमच्या मार्क नोबेलला पंचांनी पिवळे कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढले.

या स्पर्धेत मँचेस्टर युनायटेड संघ गुणतक्त्यात दुसऱया स्थानावर असून हा संघ आघाडीच्या मँचेस्टर सिटीपेक्षा 19 गुणांनी पिछाडीवर आहे. वेस्टहॅम संघ 15 व्या स्थानावर आहे. टोटेनहॅम हॉटस्पर तिसऱया स्थानावर आहे. त्यांचा एक सामना बाकी असून 19 मे रोजी टोटेनहॅम हॉटस्पर आणि चेल्सी यांच्यात एफए चषक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामना होणार आहे.